ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
संपूर्ण शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी बरेच लोक दररोज योगासने करतात. कोणती योगासने वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात, जाणून घ्या.
योगा करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे योग्य पद्धतीने श्वास घेणे. दीर्घ श्वास घेणे आणि श्वास सोडणे वजन कमी करण्यास मदत करु शकते. यासाठी भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, सूर्यभेदी प्राणायाम करा.
'द बो पोज' किंवा धनुरासन हे एक योगासन आहे जे केवळ संपूर्ण शरीराचे वजन कमी करत नाही तर पोटाची चरबी वितळवण्यास विशेषतः प्रभावी आहे. धनुरासन करण्यासाठी पोटावर झोपा. यानंतर, शरीराचा वरचा भाग मागे वाकवा आणि पाय उचलून आणि हातांनी धरण्याचा प्रयत्न करा.
उत्कटासनाला चेअर पोज असेही म्हणतात. यासाठी सरळ उभे राहा आणि हात समोर ठेवा आणि कंबर वाकवा जेणेकरून गुडघ्यांच्या पातळीवर येतील. हे योगासन केल्याने मांडीची चरबी, हाताची चरबी आणि पोटाची चरबी प्रभावित होते.
वजन कमी करण्यासाठी कोनासन हे सर्वात सोप्या योगासनांपैकी एक आहे. हे आसन केल्याने कंबरेवरील चरबी लवकर वितळते आणि शरीराचे पचन सुधारण्यास मदत होते.
भुजंगासनाला कोब्रा पोज असेही म्हणतात. वजन कमी करण्यासाठी हे योगासन बेस्ट मानले जाते.
ज्या प्रकारे प्लँक केले जाते, तसेच फलकासन देखील केले जाते. संपूर्ण शरीरातील फॅट बर्न करण्यासाठी फलकासन फायदेशीर ठरु शकते.