ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मलेरिया हा अॅनोफिलीस नावाच्या डासाच्या चाव्यामुळे होतो. जेव्हा हा डास चावतो तेव्हा प्लास्मोडियम पॅरासाइट आपल्या शरीरात प्रवेश करतो, ज्यामुळे मलेरिया होतो.
जेव्हा शरीरात मलेरिया होतो तेव्हा अनेक प्रकारची लक्षणे दिसतात. याकडे अजिबात दुर्लक्ष करु नये.
मलेरियामध्ये जास्त ताप येणे, थंडी लागणे आणि घाम येऊ शकतो. तसेच हा ताप सतत राहतो.
गंभीर प्रकरणांमध्ये, मलेरियाची लागण झालेल्या व्यक्तीच्या लघवीमध्ये रक्त येऊ शकते.
उलट्या होणे हे मलेरियाचे सामान्य लक्षण आहे. यामुळे रुग्णाच्या शरीरात अशक्तपणा येऊ शकतो.
मलेरिया झालेल्या व्यक्तीला लूज मोशन किंवा डायरिया सारख्या समस्या येऊ शकतात.
तापासोबतच, मलेरियामुळे शरीर दुखणे आणि थकवा येऊ शकतो. मलेरियाने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला खूप अशक्तपणा जाणवू शकतो.