मनाली सुनील सांगवेकर
Allu Arjun: 'पुष्पा' आणि 'पुष्पा २' च्या धमाकेदार यशानंतर साऊथ अभिनेता अल्लू अर्जुन ( Allu Arjun) आता आणखी एका ब्लॉकबास्टर चित्रपटाच्या तयारीत आहे. ज्याचे नाव ' AA22xA6 ' आहे. या चित्रपटात आता दीपीका पदुकोणची (Deepika Padukone) एंट्री झाली आहे. अशात चित्रपटाबाबत आणखी एक अपडेट समोर आली आहे.
दरम्यान चित्रपटातील विलेनची जागा हॉलीवूडचा प्रसिद्द स्टार ' वील स्मिथ ' (will smith ) घेणार आहे अशी चर्चा रंगली आहे. वील स्मिथ त्याच्या "द पर्सुइट ऑफ हॅपीनेस", "अली", "मेन इन ब्लॅक", "इंडिपेंडन्स डे" आणि "आय, रोबोट" यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते. तसेच काही काळापूर्वी वील एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत होता.
२०२२ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात होस्ट क्रिस रॉकने वीलची पत्नी जेडा पिंकेटची तिच्या टक्कल पडण्यावरून खिल्ली उडवली होती. यामुळे संतापलेल्या वीलने थेट मंचावर जाऊन होस्टच्या कानशीलात लगावली. त्याच्या या प्रतापाने सोशल मिडीयावर खळबळ उडवली होती.
साऊथ दिग्दर्शक एटलीच्या या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुनचा 'पुष्पाराज' नंतर एक अनोखा अंदाज पाहायला मिळणार. AA22xA6 हा एक अॅक्शन चित्रपट असून या चित्रपटाचा बजेट ८०० करोड इतका आहे. चित्रपटात दीपीकासह बॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकुर (Mrunal Thakur) देखील दिसणार अशी चर्चा आहे. मृणालच्या वर्कफ्रंट बद्दल बोलायचे झाले तर ती शेवटची "द फॅमिली स्टार" या तेलुगू चित्रपटात दिसली होती.