Sonu Sood On Kangana Ranaut: 'जनता देव असते, बोलण्याआधी विचार करा'; कंगना रणौतच्या Gen Z वक्तव्यावर सोनू सूदचा टोला

Sonu Sood On Kangana Ranaut: कंगना रणौतच्या Gen Z वादग्रस्त वक्तव्यावर अभिनेता सोनू सूदने अप्रत्यक्ष टीका केली. जनताच देव असल्याचे सांगत बोलण्याआधी विचार करण्याचा सल्ला त्याने दिला.
Sonu Sood On Kangana Ranaut
Sonu Sood On Kangana RanautSaam TV
Published On

Sonu Sood On Kangana Ranaut: भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतने Gen Z पिढीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अद्यापही शांत झालेला नाही. 'जनरेशन गटर' अशी टीका करत तरुण पिढीवर निशाणा साधलेल्या कंगनाला आता अभिनेता सोनू सूद यानेही अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. "जर कंगना रणौतने चुकीचे वक्तव्य केले असेल, तर ती शरमेची बाब आहे. कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी विचार केला पाहिजे," असे स्पष्ट मत त्याने व्यक्त केले.

गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या सोनू सूदने माध्यमांशी संवाद साधताना कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'मी तिचे संपूर्ण वक्तव्य ऐकलेले नाही. पण हेच युवा एखाद्याला अभिनेता बनवतात. तुम्ही अभिनेता असाल, डॉक्टर असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात असाल, जोपर्यंत जनता तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंतच तुमचे अस्तित्व आहे. जनताच देवाचे रूप आहे. त्यामुळे कोणतेही विधान करताना जबाबदारीने आणि विचारपूर्वक बोलणे आवश्यक आहे. चुकीचे वक्तव्य केल्यास त्याचा समाजावर परिणाम होतो.'

Sonu Sood On Kangana Ranaut
Mukkam Post Pandharpur: श्रद्धा आणि आत्मशोधाचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार; 'मुक्काम पोस्ट पंढरपूर' लवकरच रंगभूमीवर

काही दिवसांपूर्वी कंगना रणौतने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये Gen Z पिढीवर टीका करत त्यांना 'जनरेशन गटर' असे म्हटले होते. तसेच काही तरुणींवर अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि बेजबाबदार जीवनशैलीचे आरोप करत वादग्रस्त टिप्पणी केली होती. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली. CJP चे प्रवक्ते सौरव दास यांनीही कंगनावर निशाणा साधला होता. त्यानंतर दोघांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक युद्ध रंगले असून कंगनाने दास यांना 'बेकार' आणि 'बेरोजगार' असे म्हणत प्रत्युत्तर दिले.

Sonu Sood On Kangana Ranaut
Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

कंगनाच्या Gen Z वरील वक्तव्यामुळे सुरू झालेल्या वादात आता सोनू सूदच्या प्रतिक्रियेमुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे. जनतेचा आदर आणि जबाबदारीने व्यक्त होण्याचा संदेश देत त्याने अप्रत्यक्षपणे कंगनाच्या विधानावर टीका केल्याने या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com