Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: Gen Z मुलींबाबतच्या कंगना रणौतच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राखी सावंतने सोशल मीडियावर संताप व्यक्त केला. कंगनावर वैयक्तिक टीका करत तिने अनेक गंभीर आरोप केले.
Rakhi Sawant slams Kangana Ranaut
Rakhi Sawant slams Kangana RanautSaam Tv / AI
Published On

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत हिने अलीकडेच Gen Z आणि विशेषतः हिंदू तरुणींविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आणखी चिघळला आहे. या वक्तव्यावर आता अभिनेत्री राखी सावंतने प्रतिक्रिया देत कंगनावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राखीने कंगनाच्या विधानाचा निषेध करत तिच्यावर वैयक्तिक टीकाही केली.

राखी सावंतने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून त्यामध्ये तिने कंगनाला देशातील मुली आणि विद्यार्थ्यांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल सुनावले. "खासदार झाल्यापासून तुम्ही नक्की काय केलं आहे? जर तुम्ही निवडणूक लढवली, तर तुम्हाला जनतेचं एकही मतं मिळणार नाहीत. मंडीमध्ये तुम्ही इतके मोठे नाव कसे बनलात किंवा आज ज्या पदावर आहात तिथे कसे पोहोचलात, हेच मला समजत नाही."

Rakhi Sawant slams Kangana Ranaut
Actress Death: ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; हृदयविकाराच्या झटक्याने निधन, सिनेविश्वात हळहळ

तुम्हाला भीती वाटत नाही का?

कंगनाला 'डायन' (witch) म्हणत राखी पुढे म्हणाली, "तुम्ही आपल्या देशातील मुलींबद्दल काय बोलत आहात? तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल किंवा आपल्या राष्ट्राबद्दल काय बोलत आहात? लक्षात ठेवा, विमानतळावर तुम्हाला कानाखाली मारली गेली होती. तुम्हाला भीती वाटत नाही का? जर तुम्ही असेच वागत राहिलात, तर तुम्हाला सर्वत्र जनतेच्या नाराजीचा सामना करावा लागेल."

Rakhi Sawant slams Kangana Ranaut
Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

हिंमत असेल तर सुरक्षेशिवाय फिरून दाखवा

त्यानंतर राखीने अभिनेत्रीच्या सुरक्षा ताफ्याचा उल्लेख केला आणि तिला सुरक्षेशिवाय बाहेर पडण्याचे आव्हान दिले. ती म्हणाली, "जर तुमच्यात हिंमत असेल, तर आमच्यासारखे एकटे फिरून दाखवा. तेव्हा तुम्हाला देशातील तरुणांची खरी ताकद समजेल. संसदेत बसून तुम्ही ही कसली बडबड करत आहात?"

दरम्यान, हा संपूर्ण वाद कंगना रणौतच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळे सुरू झाला. त्या पोस्टमध्ये तिने Gen Z पिढीवर आणि काही हिंदू तरुणींवर टीका करत त्यांना "जनरेशन गटर" असे संबोधले होते. तसेच अमली पदार्थांचे सेवन, मद्यपान आणि बेजबाबदार जीवनशैलीबाबतही तिने वादग्रस्त टिप्पणी केली होती. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय व्यक्तींनीही आपापली भूमिका मांडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com