SRK Share Ritesh Kamble Video: मराठी मुलाच्या अ‍ॅक्टिंगची किंग खानला भूरळ, VIDEO शेअर करत म्हणाला - 'I Love You'

Jawan Movie Dialogue: सोशल मीडिया इनफ्लूसर आणि मराठी मुलगा रितेश कांबळेला (Ritesh Kamble) देखील शाहरुखच्या 'जवान'ने भूरळ घातली आहे.
SRK Share Ritesh Kamble Video
SRK Share Ritesh Kamble VideoSaam Tv
Published On

SRK Share Marathi Infuencer Video :

बॉलिवूडचा (Bollywod) 'किंग खान' अर्थात अभिनेता शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान'ची (Jawan Movie) सगळीकडे हवा पाहायला मिळत आहे. शाहरुखच्या चाहत्यांवर अक्षरश: जवानची क्रेझ पाहायला मिळत आहेत. या चित्रपटातील शाहरुख खानच्या डायलॉगपासून ते त्याची स्टाइल प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या चित्रपटातील डायलॉग्जवर सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ तयार करून टाकण्यात आले आहेत.

सोशल मीडिया इनफ्लूसर आणि मराठी मुलगा रितेश कांबळेला (Ritesh Kamble) देखील शाहरुखच्या 'जवान'ने भूरळ घातली आहे. नुकताच रितेशने जवानमधील एका डायलॉगवर रील तयार केले. हे रील सध्या चर्चेत आले आहे. त्यामागचे कारण म्हणजे त्याचा हा व्हिडीओ शाहरुख खानला प्रचंड आवडला आहे.

SRK Share Ritesh Kamble Video
Singer Shubhneet Singh News: कॉन्सर्ट रद्द होताच कॅनडाच्या गायकाचे सूर बदलले, म्हणाला 'भारत माझा देश'

रितेशने 'जवान' चित्रपटातील 'बेटे को हाथ लगाने से पेहले बाप से बात कर' या डायलॉगवर रील तयार केले आहे. हा रील खूपच जबरदस्त असून त्याला चांगली पसंती मिळत आहे. या रीलमध्ये दिसत आहे की, सोफ्यावर बसलेल्या रितेशला त्याची आई बेल्टने मारत असते. याचवेळी पाठीमागून त्याचे पप्पा येतात आणि त्याच्या आईच्या हातातील बेल्ट पकडतात. शाहरूख खानच्या जवानमधील स्टाईलमध्ये रितेशचे पप्पा 'बेटे को हाथ लगाने से पेहले बाप से बात कर' हा डायलॉग बोलतात. त्यानंतर रितेशची आई त्यांच्याकडे पाहतच राहते. त्यानंतर त्या रितेश आणि त्याच्या पप्पांची बेल्टच्या सहाय्याने चांगली धुलाई करताना दिसतात.

SRK Share Ritesh Kamble Video
Dipika And Shoaib Reveals Son Face: दीपिका शोएबने शेअर केली बाळाची पहिली झलक, नाव सांगत करुन दिली ओळख

या व्हिडीओच्या शेवटी जवानमध्ये शाहरुखने ज्यापद्धतीने डोक्याला पट्टी बांधली आहे तशाच लूकमध्ये रितेशचे पप्पा दिसतात आणि त्यांच्या बाजूला बसून पप्पांचा गॉगल उलटा लावून रितेश बसलेला दिसतोय. रितेश आणि त्याचे बाबा हे आईला बघून खूपच घाबरलेले असल्याचे दाखवण्यात आले आहे. या मजेशीर व्हिडीओला रितेशच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली आहे. ऐवढंच नाही तर चक्क शाहरूख खानने हा व्हिडीआ आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला असून त्यावर हसत हसत 'हे खूपच मजेशीर आहे... व्हिडीओ बनवल्याबद्दल धन्यवाद... आय लव्ह यू' असे कॅप्शन दिले आहे.

SRK Share Ritesh Kamble Video
Tanushree Dutta On Nana Patekar And Vivek Agnihotri: तनुश्री दत्ताचा नाना पाटेकरांवर पुन्हा गंभीर आरोप, विवेक अग्निहोत्रींनाही धरलं धारेवर

रितेशने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर ही रील शेअर केली असून त्याला आतापर्यंत ३ लाख ९६ हजारांपेक्षा अधिक जणांनी लाइक केले आहे. तर या व्हिडिओला २.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. रितेशच्या चाहत्यांनी हा रील जबरदस्त झाल्या असल्याच्या देखील कमेंट्स केल्या आहेत.

दरम्यान, रीलस्टार रितेश कांबळे हा मुंबईचा आहे. रितेश आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कॉमेडी आणि फनी व्हिडीओ शेअर करत असतो. रितेशच्या करीअरची सुरुवात २०१९ पासून म्हणजेच कोरोना काळापासून सुरु झाली होती. टीकटॉक बॅन झआल्यानंतर रितेशने इन्स्टाग्रामवर आणि Short Video App वर व्हिडीओ तयार करण्यास सुरुवात केली. त्याला या प्लॅटफॉर्मवर देखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. रितेशने इस्टाग्रामवर आतापर्यंत ५२२ पोस्ट केल्या आहेत. तर त्याचे ५.३ मिलिनय फॉलोअर्स आहेत. रितेशने अनेक गाण्याच्या अल्बमध्ये देखील काम केले आहे.

SRK Share Ritesh Kamble Video
Parineeti Chopra Dance Video: पंजाबी गाण्यावर बेभान नाचली परिणीती चोप्रा, एकटक बघत राहिला राघव चड्ढा; VIDEO होतोय व्हायरल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com