Singer Shubhneet Singh News: कॉन्सर्ट रद्द होताच कॅनडाच्या गायकाचे सूर बदलले, म्हणाला 'भारत माझा देश'

Shubhneet Singh Instagram Post: कॅनडीयन पंजाबी गायक शुभ म्हणजेच शुभनीत सिंगने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता.
Singer Shubhneet Singh
Singer Shubhneet SinghSaam Tv
Published On

Shubhneet Singh Concert Cancelled:

भारत आणि कॅनडामधील तणाव (India-Canada Issue) शिगेला पोहोचला आहे. अशामध्ये भारताचा अपमान करणे कॅनडात असलेल्या पंजाबी गायकाला चांगलेच महागात पडले आहे. या कॅनेडियन गायकाचा देशभरातून तीव्र निषेध केला जात आहे. कॅनडीयन पंजाबी गायक शुभ म्हणजेच शुभनीत सिंगने केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे वाद निर्माण झाला होता. त्याने या पोस्टमध्ये भारताच्या नकाशातून जम्मू-काश्मीर आणि पंजाबला हटवले होते. त्याचसोबत त्याच्यावर खलिस्तानींना सपोर्ट केल्याचा देखील आरोप आहे. या सर्व गोंधळानंतर शुभनीतचे भारतामध्ये होणारे सर्व कॉन्सर्ट रद्द करण्यात आले होते. या सर्व घटनांनंतर आता शुभनीत सिंगने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Singer Shubhneet Singh
Manapman Muhurta: संगीतप्रेमींसाठी पर्वणी, सुबोध भावेने केली आगामी चित्रपटाची घोषणा; शूटिंगलाही सुरुवात

शुभनीत सिंगच्या वादग्रस्त पोस्टनंतर बोट-स्पीकर कंपनी मुंबईमध्ये त्याचे आयोजित केलेले सर्व कॉन्सर्ट रद्द केले. 23 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान मुंबईत त्याचे कॉन्सर्ट होणार होते. कॉन्सर्ट रद्द झाल्यानंतर शुभनीत सिंग दुखावला गेला असून आता त्याचे सूर बदलले आहे. पंजाबी-कॅनडियन गायक शुभने सांगितले की, 'भारत दौरा रद्द झाल्याने तो खूप निराश आहे.' त्याने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत नाराजी व्यक्त केली आहे. 'गेल्या दोन महिन्यांपासून मी भारत दौऱ्यासाठी कठोर प्रशिक्षण घेत आहे आणि भारतामध्ये होणाऱ्या माझ्या कार्यक्रमाबद्दल मी खूप उत्सुक आहे.' असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.

Singer Shubhneet Singh
National Cinema Day Offer: फक्त ९९ रुपयांमध्ये आवडता चित्रपट पाहण्याची संधी, कधी, कुठे आणि कशी? वाचा एका क्लिकवर

शुभने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'भारतातील पंजाबमधून येणारा एक तरुण रॅपर-गायक या नात्याने माझे संगीत आंतरराष्ट्रीय मंचावर आणणे हे माझे आयुष्याचे स्वप्न होते. पण अलीकडील काही घटनांमुळे माझ्या मेहनतीवर आणि प्रगतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे माझी निराशा आणि दुःख व्यक्त करण्यासाठी मला बोलायचे होते. माझा भारत दौरा रद्द झाल्याने मी अत्यंत निराश झालो आहे. माझ्या स्वत:च्या देशात, माझ्याच लोकांसमोर गाणं गाण्यासाठी मी खूप उत्सुक होतो. तयारी जोरात सुरू होती आणि गेल्या दोन महिन्यांपासून मी त्यासाठी मनापासून सराव करत होतो. आणि मी भारतामध्ये जाण्यासाठी खूप उत्साही, आनंदी होतो आणि परफॉर्म करण्यास तयार होतो. पण मला वाटतं नियतीला वेगळंच काहीतरी होतं.'

शुभनीतने या पोस्टमध्ये पुढे असे देखील म्हटले आहे की,'भारत माझाही देश आहे. माझा जन्म इथेच झाला. ही माझ्या गुरूंची आणि माझ्या पूर्वजांची भूमी आहे, ज्यांनी या भूमीच्या स्वातंत्र्यासाठी, तिच्या वैभवासाठी आणि कुटुंबासाठी बलिदान देण्यासाठी एका क्षणाचाही विचार केला नाही. पंजाब हा माझा आत्मा आहे, पंजाब माझ्या रक्तात आहे. आज मी जो काही आहे तो पंजाबी असल्यामुळेच आहे. पंजाबींना देशभक्तीचा पुरावा देण्याची गरज नाही. इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये पंजाबींनी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपले प्राणांची अहुती दिली. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की प्रत्येक पंजाबींना फुटीरतावादी किंवा देशद्रोही असे लेबल लावणे टाळा.'

Singer Shubhneet Singh
Vijay Antony Shared Emotional Post: ‘तिच्यासोबत माझाही मृत्यू झाला...’; मुलीच्या आत्महत्येनंतर विजय अँटोनीची भावुक पोस्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com