
मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने राष्ट्रीय चित्रपट दिन जाहीर केला आहे. मागच्या वर्षीही चित्रपटांचा हा फेस्टिव्हल साजरा करण्यात आला होता. आता यावर्षी सुद्धा हा दिवस चित्रपटप्रेमींसाठी साजरा केला जाणार आहे. मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने १३ ऑक्टोबर २०२३ हा राष्ट्रीय चित्रपट दिन म्हणून घोषित केला आहे. हा दिवस चित्रपटप्रेमींसाठी खास पर्वणी असणार आहे. त्यांना त्यांच्या आवडीचा चित्रपट फक्त ९९ रुपयांमध्ये पाहायला मिळणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील राष्ट्रीय चित्रपट दिन जाहीर करण्यात आला आहे. मागच्यावर्षी राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त चित्रपटप्रेमींकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला होता. चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. तेव्हा फक्त ७५ रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांचा आनंद घेता आला होता. आता या वर्षी देखील या दिवसाचा आनंद चित्रपटप्रेमींना घेता येणार आहे. सध्या 'जवान' आणि 'गदर २' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जादू पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांकडून या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून दोन्ही चित्रपटांनी भरघोस कमाई केली आहे. आता राष्ट्रीय चित्रपट दिनानिमित्त या दोन्ही चित्रपटांवर भरघोस सूट देण्यात येणार आहे.
या वर्षीही मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाने पुन्हा एकदा ही ऑफर आणली आहे. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रीय चित्रपट दिन साजरा केला जाईल. या दिवशी देशभरातील सर्व चित्रपटगृहातील चित्रपटांच्या तिकीट फक्त ९९ रुपये असणार आहेत. 'जवान' असो की 'गदर २' किंवा नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट प्रेक्षकांना फक्त १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
चित्रपटांच्या या महोत्सवात ४००० स्क्रीन्सचा समावेश आहे. यामध्ये पीव्हीआर आयनॉक्स, सिनेपोलिस, मिराज, सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मूव्ही टाईम, वेव्ह, एम3के आणि डीलाइटसह अनेक मल्टिप्लेक्स आणि थिएटर्सचा समावेश आहे. मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या या ऑफरने २०२२ साली चित्रपटगृहांबाहेर प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. याचा फायदा चित्रपटांनाही झाला.
मागच्या वर्षी रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्'त्रला राष्ट्रीय चित्रपट दिनाचा सर्वाधिक फायदा झाला आणि चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती. यावेळीही अनेक मोठ्या चित्रपटांचा या यादीत समावेश आहे. सध्या 'जवान' आणि 'गदर २' चित्रपटगृहात आहेत. काही दिवसांनी 'फुरके 2' आणि 'द व्हॅक्सीन वॉर' देखील प्रदर्शित होणार आहेत. आता या चित्रपटांना राष्ट्रीय चित्रपट दिनाचा फायदा होणार की नाही हे लवकरच समोर येईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.