Konkan Hearted Girl Got Trolled: रिफायनरी प्रकल्पावर मांडलं आपलं मत, अन् ‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली ट्रोल

Konkan Hearted Girl Got Trolled: पोस्टर बॉयने सोशल मिडियावर अप्रत्यक्षपणे ‘कोकण हार्टेड गर्ल’ ला ट्रोल केले आहे.
Kokan Hearted Girl Got Trolled On Barsu Refineries Viral Poster
Kokan Hearted Girl Got Trolled On Barsu Refineries Viral PosterSaam Tv
Published On: 

Kokan Hearted Girl Got Trolled On Barsu Refineries Viral Poster: सध्या बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. सोबतच काही राजकीय नेते ही कोकणात जाऊन सभा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या मोठ्या सत्तापालटानंतर अनेक मोठ- मोठे प्रोजेक्ट महाराष्ट्राबाहेर गेले. त्यानंतर आता महाराष्ट्रातल्या कोकणात सुरू असलेल्या वारसू प्रोजेक्टला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. सध्या बारसू रिफायनरीवरून सोशल मीडियावर कमालीची चर्चा सुरू आहे.

Kokan Hearted Girl Got Trolled On Barsu Refineries Viral Poster
Myra Vaikul New Serial: मायरा वायकुळचे हिंदीत पदार्पण; स्नेहा वाघसोबत साकारणार प्रमुख भुमिका

या बारसू रिफायनरी मुळे कोकणातील वातावरणात, पर्यावरणामध्ये वाईट परिणाम, फळ झाडे नष्ट होणे, रिफायनरीतून बाहेर पडणाऱ्या दुषित पाण्यामुळे तेथील नद्या दुषित होतील, सोबत कोकणातील उद्योग धंद्यावर आणि मासेमारीवर परिणाम होणार असल्याचा आरोप सध्या स्थानिक नागरिक करत आहेत. सोबतच बारसू गावच्या जागेवरून स्थानिकांमध्ये प्रचंड विरोध होत आहे. यासर्वांमध्ये गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ने एका व्हिडीओच्या माध्यमातून या प्रकल्पावर तिने भाष्य केलं आहे.

सोशल मीडिया एन्फ्लुएंसर ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रभू- वालावलकर ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते. मालवणी भाषेचा वापर करत ती युट्युबवर व्हिडीओ शेअर करते. फुड आणि टुरिझमच्या कंटेंटचा वापर करत ती व्हिडीओ बनवत शेअर करते. गेल्या काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रिफायनरीच्या मुद्द्यावर अंकिताने एक व्हिडीओ शेअर केला होता. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून सध्या ती कमालीची ट्रोल होत आहे.

Kokan Hearted Girl Got Trolled On Barsu Refineries Viral Poster
Ananya Pandey Trolled : पर्स आहे की बादली? अनन्याची हटके फॅशन पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

'ताई कोकण भडकलयं आता कधी बोलणार' असा सवाल सध्या नेटकरी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारत आहेत. यानंतर अंकिताने तिच्या युट्यूब अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये तिने, मुंबईच्या रिफायनरीचा आढावा घेतला असून व्हिडिओमध्ये रिफायनरीमध्ये कशाप्रकारे काम केलं जातं. याबद्दल सविस्तर माहिती दिली.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर काही जण तिच्या समर्थनार्थ आहेत, तर काही जण तिला ट्रोल करत आहे. त्यातच आता एका पोस्टर बॉयने सोशल मिडियावर पोस्टरमधील फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहे. या पोस्टरच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता प्रमोद प्रभू-वालावलकर हिला ट्रोल केले आहे.

पोस्टर बॉयने हा फोटो शेअर करत पोस्टरवर लिहिले की, “ताईने सुंदर कोकण दाखवून आणि मालवणी भाषा बोलून यूट्यूब वर पैसे कमावले.... आणि आता ताई कोकणात रिफायनरी ला समर्थन देतेय... असं कसं चालेल ताई ? ”हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून रिफायनरीच्या मुद्यावर नवे वाद विवाद आहेत.

अनेक राजकीय नेत्यांनीही याचा विरोध करत ग्रामस्थांना पाठिंबा दिला आहे. तर काहींनी या प्रकल्पाला पाठिंबा देत रिफायनरीमुळे रोजगार निर्मीती होईल आणि विकासाच्या अनेक वाटाही खुल्या होतील असं त्याचं मतं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com