Ananya Pandey Trolled : पर्स आहे की बादली? अनन्याची हटके फॅशन पाहताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल...

नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या अॅवार्ड फंक्शनमध्ये अनन्या सहभागी झाली होती.या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Ananya Pandey News
Ananya Pandey NewsSaam Tv

Ananya Pandey Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे तिच्या फॅशनसेन्समुळे कायमच प्रकाशझोतात असते. नुकत्याच मुंबईत पार पडलेल्या अॅवार्ड फंक्शनमध्ये अनन्या सहभागी झाली होती.या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये अनन्या हटके स्टाईलमध्ये दिसतेय. याशिवाय तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ज्यामध्ये अनन्याला ट्रोल केले जात आहे.

Ananya Pandey News
Shabana Azmi On The Kerala Story Controversy: द केरला स्टोरीला शबाना आजमींचा पाठिंबा... चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्यांना दिले सडेतोड उत्तर

बॉलिवूड विश्वात अनेक सेलिब्रिटी पार्ट्या, इव्हेंट्स आणि अवॉर्ड शो होत असतात. ज्यामध्ये अनेक सेलिब्रिटी आपली उपस्थिती दर्शवतात आणि आपल्या स्टायलिश लूकने प्रेक्षकांना भुरळ घालतात. तर कधी ट्रोल देखील होतात. सध्या बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. मुंबईमध्ये पार पडलेल्या अॅवार्ड फंक्शनमध्ये अनन्या उपस्थित होती. यावेळी अनन्या तिच्या लूकमुळे नाही तर तिच्या पर्समुळे चर्चेत आली. तिने बादलीच्या आकाराची एक छोटी पर्स कॅरी केली होती जी पाहून नेटकऱ्यांनी अनन्याला चांगलेच धारेवर धऱले आहे.(Latest Entertainment News)

Ananya Pandey News
Support For The Kerala Story In Pune: पुण्यातील भोरमध्ये 'केरळा स्टोरी' चित्रपटाला समर्थन; हिंदुत्ववादी संघटनांनी लावले बॅनर्स

मुंबईमध्ये नुकताच मोस्ट स्टायलिश अॅवार्ड सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलीवूड स्टार्स माधुरी दीक्षित, क्रिती खरबंदा, जान्हवी कपूर, क्रिती सेनॉन, शिल्पा शेट्टी, सुष्मिता सेन, श्रिया सरन, रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांसारखे कलाकार उपस्थित होते. यावेळी अनन्या पांडे गुलाबी रंगाच्या आउटफिटमध्ये ग्लॅमरस दिसत होती. पण तिच्या लूकपेक्षा तिच्या हातातील सोनेरी रंगाच्या पर्सने लक्ष वेधून घेतले.

अनन्या पांडे ही तिच्या स्टायलिश अंदाजाने नाही तर बादलीच्या आकाराच्या पर्समुळे सध्या चर्चेत आहे.सोशल मीडियावर अनन्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिने गुलाबी रंगाचा आउटफिट परिधान केला आहे. या सोबतच अनन्याने ग्लॉसी मेकअपसह सोनेरी रंगाची पर्स कॅरी केली आहे.अनन्याची पर्स पाहून नेटकरी तिची खिल्ली उडवत आहे.

नेटकऱ्यांनी तिला "ही पर्स आहे की बादली? असं विचारलं, तर आणखी एकाने "ही तर डाळ वाढायची बादलीच आहे" असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर अनन्याचा व्हिडिओ व्हायरल होत असून नेटकरी त्यावर मजेदार कमेंट करत आहे. "ही पर्स नाही बादलीच आहे, जाताना यामधून दाल खिचडी भरून ने" असे म्हणत एकाने तिची खिल्ली उडवली आहे"

Ananya Pandey News
Konkan Hearted Girl: “अन् “त्या” नंतर “ते” दोघं भेटले. ” ओंकारला पाहून ‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली लाजून चुर्ररर...

अनन्या पांडेच्या कामाविषयी बोलायचे तर, तर ती आगामी चित्रपटात आयुष्मान खुरानाबरोबर स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. ‘ड्रीम गर्ल २’ या आगामी चित्रपटात ती झळकणार आहे.या आधी अनन्या विजय देवरकोंडाबरोबर ‘लायगर’मध्ये दिसली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com