Support For The Kerala Story In Pune: पुण्यातील भोरमध्ये 'केरळा स्टोरी' चित्रपटाला समर्थन; हिंदुत्ववादी संघटनांनी लावले बॅनर्स

देशात काही ठिकाणी चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातली जात असून पुण्यात मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं,‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत.
Support For The Kerala Story In Pune
Support For The Kerala Story In PuneSaam Tv

सचिन जाधव- पुणे

Support For The Kerala Story In Pune: सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाचा वाद काही संपायचं नाव घेत नाही. प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट कमालीचा चर्चेत आहे. अनेक राज्यात या चित्रपटाला विरोध होत असून यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. असं असताना पुण्यात मात्र हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येत,‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या समर्थनार्थ बॅनर लावले आहेत.

Support For The Kerala Story In Pune
Konkan Hearted Girl: “अन् “त्या” नंतर “ते” दोघं भेटले. ” ओंकारला पाहून ‘कोकण हार्टेड गर्ल’ झाली लाजून चुर्ररर...

भोर शहरात ठिकठिकाणी बॅनर लावत अनेक हिंदुत्ववादी संघटना पुण्यात एकत्र येऊन नागरिकांना चित्रपट पाहण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्या संघटनांनी नागरिकांना “एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल. पण ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट नक्कीच दाखवा. सर्व माता- भगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट आवश्य पहावा. ” अशा आशयाचे बॅनर पुण्यातील भोर शहरात लावले आहेत. या बॅनरमध्ये एका बाजूला ‘द केरला स्टोरी’चित्रपटाचे बॅनर आहे, तर दुसऱ्या बाजुला वरील आशय छापण्यात आला आहे.

भोरमध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येतं, ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या समर्थनार्थ बॅनर लावत चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचं आवाहन यावेळी पुणेकरांना केले आहे. भोर शहरात ठिकठिकाणी हे बॅनर लावण्यात आले असून एक वेळ मुलींना केरळ दाखवले नाही तरी चालेल, पण ‘द केरला स्टोरी’ अवश्य दाखवा, सर्व माताभगिनींनी जवळच्या चित्रपटगृहात जाऊन अवश्य चित्रपट पहावा,अशा आशयाचे हे बॅनर लावलेत. सध्या या बॅनरची चर्चा संपूर्ण पुण्यात कमालीची सुरू आहे. भोर शहरातील अनेक चौका- चौकांत याची चर्चा सुरू आहे.

Support For The Kerala Story In Pune
Sharad Ponkshe On The Kerala Story: आपल्या मुलींना फसवलं जातं... 'द केरला स्टोरी' चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षेंचे हिंदूंना आवाहन

चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास, ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट ५ मे रोजी देशभरात प्रदर्शित झाला आहे. अनेकांनी चित्रपट पाहिल्यावर त्याची प्रशंसा केली आहे, तर काहींनी चित्रपटाला प्रोपगेंडा म्हणत आहेत. या मुद्द्यावरून देशात वादाची लाट उसळली असून या चित्रपटातील जवळपास १० सीनला कात्री लावल्यानंतर ए सर्टिफिकेट मिळालं आहे.

निर्मात्यांच्या मते, हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. ‘द केरला स्टोरी’ मध्ये दावा केला आहे की केरळच्या ३२ हजार मुलींना मुसलमान धर्म स्विकारण्याची जबरदस्ती केली गेली होती. त्यानंतर त्यांना ISIS मध्ये सामिल करण्यात आलं. चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी मुख्य भूमिकेत आहेत. या चौघींच्या ही अभिनयाचे खूप कौतुक होत आहे.

Edited By: Chetan Bodke

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com