New Web Series : गुंतलेल्या नात्यांची नवी कथा, शोभिता धुलिपाला - अर्जुन माथूर यांच्या 'Made In Heaven 2'चा दमदार ट्रेलर आऊट

Made In Heaven 2 : मेड इन हेवन 2 चा या वेबसीरीजचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे.
Made In heaven 2 Trailer
Made In heaven 2 TrailerSaam TV
Published On

Made In Heaven 2 Trailer Out : मेड इन हेवन 2 चा या वेबसीरीजचा ट्रेलर अखेर प्रदर्शित झाला आहे. शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर, त्यांच्या वेडिंग प्लॅनर्सच्या टीमसह, त्याचा वेडिंग बिजनेस पुन्हा सुरू करण्यास तयार आहेत. मंगळवारी, कलाकार आणि निर्मात्यांनी ट्रेलरचे अनावरण केले आहे.तर 10 ऑगस्ट रोजी मेड इन हेवन 2 चा प्रीमियर होणार आहे.

'मेड इन हेवन 2' चा ट्रेलर

मेड इन हेवन सीझन 2 ट्रेलर पुन्हा एकदा गुंतागुंतीचे नातेसंबंध, वैयक्तिक संघर्ष आणि नैतिकता यांच्यावर प्रकाश टाकणार आहे. मेड इन हेवन 2 मध्ये सीझन 1 मधील कलाकार आहेत. शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, कल्की कोचलिन, जिम सरभ, शशांक अरोरा आणि शिवांगी रस्तोगीसह काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत.

Made In heaven 2 Trailer
Kartik Aaryan's First Look : हिरोची भूमिका केल्याचा अभिमान आहे... कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन'मधील First Look आऊट

मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा यांचा या सीजनमध्ये समावेश आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मृणाल ठाकूर, राधिका आपटे, शिबानी दांडेकर आणि सारा जेन डायस वधूच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर त्यांच्या नात्यात आणि आर्थिक बाबींमध्ये संघर्ष करत आहेत. कर्ज, व्यवसाय विस्तार आणि घटस्फोट यांच्यातून मार्ग काढत आहेत. तसेच त्यांची टीमला आणि कस्टमरला देखील बराच संघर्ष करावा लागत असल्याचे या सीजनमध्ये दिसणार आहे. एक वाईट नातं आणि सिक्रेट अफेअर आणि कमिटमेंट इश्यू, मेड इन हेवन 2 च्या ट्रेलरमध्ये यासर्व गोष्टी दाखविल्या आहेत.

Made In heaven 2 Trailer
Mitali- Siddharth Good News Rumours: सिद्धार्थ- मिताली ‘गुड न्यूज’ देणार?, अभिनेत्रीने शेअर केलेल्या कॅप्शनने वेधलं लक्ष

एक्सेल मीडिया एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी निर्मित, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित मालिका अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केली आहे.

इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर करताना, चित्रपट निर्माता फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर लिहिले, “लग्नाचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे. मेड इन हेवन सीझन 2 मध्ये तुमच्या आवडत्या वेडिंग प्लॅनर्सना पुन्हा पहा. ट्रेलर आऊट!”मेड इन हेवन सीझन 2 ट्रेलर पुन्हा एकदा गुंतागुंतीचे नातेसंबंध, वैयक्तिक संघर्ष आणि नैतिकता यांच्यावर प्रकाश टाकणार आहे.

मेड इन हेवन 2 मध्ये सीझन 1 मधील कलाकार आहेत. शोभिता धुलिपाला, अर्जुन माथूर, कल्की कोचलिन, जिम सरभ, शशांक अरोरा आणि शिवांगी रस्तोगीसह काही नवीन चेहरे देखील दिसणार आहेत. मोना सिंग, इश्वाक सिंग आणि त्रिनेत्रा यांचा या सीजनमध्ये समावेश आहे. दुसऱ्या सीझनमध्ये मृणाल ठाकूर, राधिका आपटे, शिबानी दांडेकर आणि सारा जेन डायस वधूच्या भूमिकेत दिसणार आहेत.

शोभिता धुलिपाला आणि अर्जुन माथूर त्यांच्या नात्यात आणि आर्थिक बाबींमध्ये संघर्ष करत आहेत. कर्ज, व्यवसाय विस्तार आणि घटस्फोट यांच्यातून मार्ग काढत आहेत. तसेच त्यांची टीमला आणि कस्टमरला देखील बराच संघर्ष करावा लागत असल्याचे या सीजनमध्ये दिसणार आहे. एक वाईट नातं आणि सिक्रेट अफेअर आणि कमिटमेंट इश्यू, मेड इन हेवन 2 च्या ट्रेलरमध्ये यासर्व गोष्टी दाखविल्या आहेत.

एक्सेल मीडिया एंटरटेनमेंट आणि टायगर बेबी निर्मित, आंतरराष्ट्रीय एमी नामांकित मालिका अलंकृता श्रीवास्तव, नीरज घायवान, नित्या मेहरा, रीमा कागती आणि झोया अख्तर यांनी दिग्दर्शित केली आहे.

इन्स्टाग्रामवर ट्रेलर शेअर करताना, चित्रपट निर्माता फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर लिहिले, “लग्नाचा हंगाम अधिकृतपणे सुरू झाला आहे. मेड इन हेवन सीझन 2 मध्ये तुमच्या आवडत्या वेडिंग प्लॅनर्सना पुन्हा पहा. ट्रेलर आऊट!” (Latest Entertainment News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com