Sitaare Zameen Par : आमिर खानच्या घरी रंगली म्युझिकल नाईट; सचिन तेंडुलकर अन् राज ठाकरेंची सरप्राइज एन्ट्री, पाहा VIDEO

Sitaare Zameen Par Musical Night : 'सितारे जमीन पर' चित्रपटाच्या म्युझिकल नाईटला राज ठाकरे आणि सचिन तेंडुलकर यांनी हजेरी लावली. याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
Sitaare Zameen Par Musical Night
Sitaare Zameen ParSAAM TV
Published On

2007 मध्ये रिलीज झालेला सुपरहिट 'तारे जमीन पर' या चित्रपटाचा सीक्वल 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par ) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. या पार्श्वभूमीवर आमिर खानने (Aamir Khan) आपल्या निवासस्थानी एक खास म्युझिकल नाईटचे आयोजन केले. या कार्यक्रमात बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली. आमिर खानने आयोजित केलेल्या म्युझिकल नाईटमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray ) आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांनी सरप्राइझ भेट दिली.

म्युझिकल नाईटला सचिन तेंडुलकरसोबत त्यांची पत्नी अंजली तेंडुलकरही उपस्थित होती. या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या म्युझिकल नाईटमध्ये 'सितारे जमीन पर' चित्रपटातील 10 नवोदित कलाकारांनी आपल्या कुटुंबासोबत सहभाग घेतला. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी याला हजेरी लावली होती. रणबीर कपूर यांनी सर्व मुलांबरोबर फोटो काढले. आमिर खानने स्वतःही या मुलांबरोबर वेळ घालवला. तसेच त्यांचे मनोबल वाढवत होते.

'सितारे जमीन पर' चित्रपटाचे दिग्दर्शक आर. एस. प्रसन्ना यांनीही मुलांसोबत वेळ घालवला आणि कार्यक्रमाच्या आनंदात सहभागी झाले. या संध्याकाळी प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा आणि संगीतकार त्रिकूट शंकर-एहसान-लॉय यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला चारचाँद लागले. 'सितारे जमीन पर' चित्रपट 20 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'सितारे जमीन पर' चित्रपटात 10 नवोदित कलाकार अरूष दत्ता, गोपी कृष्ण वर्मा, सम्वित देसाई, वेदांत शर्मा, आयुष भंसाली, आशीष पेंडसे, ऋषी शाहानी, ऋषभ जैन, नमन मिश्रा आणि सिमरन मंगेशकर पाहायला मिळणार आहेत.'सितारे जमीन पर' चित्रपटात आमिर खान आणि जिनिलीया देशमुख मुख्य भूमिकांमध्ये झळकणार आहे. चित्रपटात प्रेम, हास्य आणि आनंदाचा अनुभव पाहायला मिळत आहे.

Sitaare Zameen Par Musical Night
Gautami Patil : 'मैं छमछम नाचूंगी...'; रिमझिम पावसात गौतमी पाटील बेभान होऊन नाचली, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com