Sonu Nigam : सोनू निगम विरोधात FIR दाखल; पहलगामसोबत तुलना पडली महागात, नेमकं प्रकरण काय?

FIR Against Sonu Nigam : प्रसिद्ध गायक सोनू निगम याच्या विरोधात FIR दाखल करण्यात आला आहे. नेमकं प्रकरण काय, सविस्तर जाणून घेऊयात.
FIR Against Sonu Nigam
Sonu NigamSAAM TV
Published On

आपल्या गाण्यांमुळे कायम चर्चेत असलेला सोनू निगम ( Sonu Nigam ) सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे. सोनू निगम आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडला आहे. त्याच्याविरुद्ध FIR नोंदवण्यात आला आहे. सध्या सोनू निगम जगभरात त्याचे म्युझिक कॉन्सर्ट करत आहे. त्याच्या कॉन्सर्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. एका कॉन्सर्टमध्ये त्यांने केलेल्या वक्तव्यामुळे तो पुन्हा चर्चेत आला आहे. नेमकं प्रकरण काय, जाणून घेऊयात.

अलिकडेच झालेल्या एका म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका चाहत्याने सोनू निगमला कन्नड गाण्याने गाण्याची विनंती केली. तेव्हा त्याला उत्तर देत सोनू निगमने पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला त्यामुळे सोनू निगमवर FIR दाखल करण्यात आला आहे. चाहत्याने केलेली मागणी सोनू निगमने वेगळे अर्थाने घेतली आणि तो म्हणाला की, मी तुमच्या जन्माआधीपासून कन्नड गाणी गातोय. यामुळेच पहलगाममध्ये हल्ला झाला आहे. याच प्रकारच्या वृत्ती कारणीभूत आहे.

चाहत्याने केलेल्या मागणीची सोनू निगमने थेट पहलगाम हल्ल्यासोबत तुलना केली. असे केल्यामुळे बंगळुरु येथील अनेक कन्नड संघटनांनी अवलाहल्ली पोलीस स्टेशनमध्ये सोनू निगम विरोधात FIR दाखल केला. यावर आता उत्तर देत सोनू निगम म्हणाला की, "कोणत्याही भाषेचा आणि संस्कृतीचा अपमान करणे हा माझा उद्देश नव्हता.कन्नड संगीतासोबत माझे नाते जुने आहे. परदेशी जेव्हा माझे कॉन्सर्ट असते तेव्हा मी एक कन्नड गाणे गातोच."

सोनू निगमचा मोठा चाहता वर्ग आहे. त्याचे इन्स्टाग्रामवर 3.1 मिलियन फॉलोअर्स आहे. तो इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असतो. आपल्या कामाचे अपडेट तो चाहत्यांसोबत कायम शेअर करतो. त्याचे कॉन्सर्टचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर कायम व्हायरल होत असतात. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

FIR Against Sonu Nigam
Raid 2 Box Office Collection : रितेश देशमुखचा 'रेड 2' लवकरच करणार बजेट वसूल, दुसऱ्या दिवशी कमाई किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com