Badshah Wedding: रॅपर बादशाहने गुपचूप घरच्या घरी केलं दुसरं लग्न?; कोण आहे बायको?

Badshah Wedding: रॅपर बादशाह आणि ईशा रिखी यांचे लग्न झाल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो बादशाहच्या सासूबाईंनी शेअर केले आहेत. हे फोटो व्हायरल होताच चाहते थक्क झाले आहेत.
Badshah Wedding
Badshah WeddingSaam Tv
Published On

Badshah Wedding: प्रसिद्ध रॅपर आणि गायक बादशाह त्याच्या गाण्यामुळे नेहमी चर्चेत असतो पण आता बादशाह आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. सोशल मीडियावर सध्या त्याचे आणि अभिनेत्री ईशा रिखीचे काही फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, या दोघांनी गुपचूप लग्न केल्याची चर्चा रंगली आहे. या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

व्हायरल आलेल्या फोटोंमध्ये बादशाह आणि ईशा पारंपरिक विवाहच्य पोशाखात दिसत आहेत. ईशाने लाल रंगाच्या सलवार सूट परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून, बादशाहने हिरव्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. दोघांनी गळ्यात वरमाला घातलेली असून दोघेही लग्न विधी करताना दिसत आहेत.

Badshah Wedding
Fame Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; 'या' गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

विशेष म्हणजे, हे फोटो बादशाह किंवा ईशा यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले नाहीत. तर, ईशाची आई आणि बादशाहची सासू पूनम रिखी यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर हे फोटो शेअर केल्याचे समोर आले आहे. त्यांनी या जोडप्याला आशीर्वाद देत “देव तुम्हाला सुखी ठेवो” असे कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

Badshah Wedding
Dhurandhar 2: 'धुरंधर २' कायदेशीर अडचणीत; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका दाखल

हे बादशाहाचे पहिले लग्न नसून त्याचे यापूर्वी लग्न झाले होते. बादशाहचे खरे नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया आहे. त्याने यापूर्वी जस्मिन मसिह हिच्यासोबत लग्न केले होते. २०१२ मध्ये लग्न झाल्यानंतर २०१७ मध्ये ते वेगळे झाले आणि २०२० मध्ये घटस्फोट झाला. त्यांना जेसेमी मसिह सिंग नावाची एक मुलगी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com