Fame Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; 'या' गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

Fame Actress Death: प्रख्यात हॉलिवूड अभिनेत्री व्हॅलेरी पेरीन यांचे गंभीर आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांचे चाहते अत्यंत शोकाकुल झाले आहेत. त्यांच्या निधनाची बातमी जवळच्या मित्राने सांगितली आहे.
Superman Fame Hollywood Actress Valerie Perrine passes away
Superman Fame Hollywood Actress Valerie Perrine passes awaySaam Tv
Published On

Fame Actress Death: हॉलिवूडमधील ‘सुपरमॅन’ चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेल्या अभिनेत्री व्हॅलेरी पेरिन यांचे वयाच्या 82 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 23 मार्च 2026 रोजी कॅलिफोर्नियातील बेव्हरली हिल्स येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या अनेक वर्षांपासून पार्किन्सन या गंभीर आजाराशी झुंज देत होत्या.

व्हॅलेरी पेरिन यांनी 1978 मधील ‘सुपरमॅन’ या चित्रपटात ईव्ह टेशमॅकर ही भूमिका साकारून प्रचंड लोकप्रियता मिळवली. या भूमिकेमुळे त्या जागतिक स्तरावर ओळखल्या जाऊ लागल्या. तसेच 'सुपरमॅन 2' मध्येही त्यांनी हीच भूमिका पुन्हा साकारली.

Superman Fame Hollywood Actress Valerie Perrine passes away
Dhurandhar 2: 'धुरंधर 2' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, रणवीर सिंग विरोधात गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

त्यांच्या कारकिर्दीतील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1974 मधील ‘लेनी’ हा चित्रपट. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना ऑस्कर नामांकन मिळाले होते. तसेच कॅन्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही त्यांनी पटकावला होता.

Superman Fame Hollywood Actress Valerie Perrine passes away
Ranveer Singh: VFX किंवा AI नाही, 'धुरंधर २' मधील रणवीर सिंगचा 'तो' लूक असा केला होता तयार, पाहा व्हायरल VIDEO

व्हॅलेरी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात लास वेगासमधील शो गर्ल म्हणून केली होती. त्यानंतर त्यांनी ‘‘स्लॉटरहाऊस-फाईव्ह’, ‘द लास्ट अमेरिकन हीरो’ आणि ‘द इलेक्ट्रिक हॉर्समन’’ यांसारख्या चित्रपटांत काम करून हळूहळू हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले.

2015 साली त्यांना पार्किन्सन आजाराचे निदान झाले होते. गेल्या 15 वर्षांपासून त्या या आजाराशी झुंज देत होत्या. त्यांच्या प्रकृतीत कालांतराने आणखी खालावत गेली. याचा परिणाम त्यांच्या हालचाली, बोलणे आणि खाण्यावर झाला. त्यांच्या निधनाची माहिती त्यांच्या जवळच्या मित्रांनी दिली. त्यांनी सांगितले की, व्हॅलेरी यांनी आपल्या आजाराचा खंबीरपणे सामना केला आणि कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या निधनाने हॉलिवूडमधील एक महत्त्वपूर्ण अभिनेत्री हरपली असून चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com