Sidharth Malhotra: सिद्धार्थची भारतासह परदेशात हवा, संपत्ती पाहून डोळे विस्फारतील...

सिद्धार्थ एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो?, सोबतच त्याचे वार्षिक उत्पन्न किती असा सवाल सर्वांनाच पडला असेल. जाणून घेऊया त्याच्या संपत्तीबद्दल...
Sidharth Malhotra
Sidharth MalhotraSaam Tv
Published On

Sidharth Malhotra: अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राचा आज 3८ वा वाढदिवस साजरा करत आहे. आपल्या मेहनतीनं सिद्धार्थने बॉलिवूडमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याची गणना बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांमध्ये केली जाते. सिद्धार्थ एका चित्रपटासाठी किती मानधन घेतो?, सोबतच त्याचे वार्षिक उत्पन्न किती असा सवाल सर्वांनाच पडला असेल. जाणून घेऊया त्याच्या संपत्तीबद्दल...

Sidharth Malhotra
Siddharth Malhotra: सिद्धार्थच्या गर्लफ्रेंड्सची लिस्ट मोठी! कियाराआधी 'या' अभिनेत्रींना केलंय डेट...

एका हिंदी संकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार, त्याची महिन्याभराची कमाई 50 लाखांपेक्षा जास्त असून वार्षिक कमाई 6 कोटी इतकी आहे. सिद्धार्थ अनेक मोठ- मोठ्या ब्रँडसाठी वेगवेगळ्या जाहिराती करत असतो. याशिवाय तो न्यूझीलंडमध्ये टुरिझमसाठीही ब्रँड अॅम्बेसेडर आहे. सिद्धार्थ त्याच्या चित्रपटांसाठी ५ ते ७ कोटी रुपये इतके मानधन आकारतो तर एका जाहिरातीसाठी ते 2 ते 3 कोटी रुपये इतके मानधन आकारतो.

Sidharth Malhotra
Urfi Javed Controversy: तेरी मम्मी मेरी सासू, उर्फीची 'ही' नवीन सासू आहे तरी कोण?

सिद्धार्थला बाईक आणि लक्झरी कारचा खुपच आवड आहे. सिद्धार्थकडे हार्ले डेव्हिडसन ही स्पोर्टस बाईक सुद्धा आहे, त्याची किंमत 14 लाख रुपये इतकी आहे. सोबतच सिद्धार्थकडे रेंज रोव्हरही अलिशान कार देखील आहे.

सोबतच SUV आणि Mercedes Benz ML 3504 MATIC या अलिशान कार देखील आहेत. सिद्धार्थ मुंबईतील पाली हिल भागात सध्या स्थित आहे. त्याचे घर गौरी खानने डिझाइन केले आहे. सोबतच सिद्धार्थला गॅजेट्सचीही खूप आवड आहे.

Sidharth Malhotra
Mirzapur Season 3: कालिन भैय्या गुड्डुचा बदला घेणार का?, 'मिर्झापूर' चा तिसरा सीझन लवकरच येणार...

शेरशाह चित्रपटात सिद्धार्थ शेवटचा दिसला होता. 'शेरशाह'मध्ये सिद्धार्थसोबत कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत होती. रुपेरी पडद्यावर एकत्र दिसलेली ही जोडी आता रियल लाईफमध्येही एकत्र दिसणार आहे.

लवकरच येत्या काही दिवसांमध्ये ही जोडी लग्नबंधनात अडकणार आहे. यावर्षी सिद्धार्थचे अनेक बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित वेबसीरिज आणि चित्रपटही प्रदर्शित होणार असल्याच्या चर्चा होत आहेत. त्याने आपल्या कलाकृतींसाठी बरेच मानधन आकारले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com