Shah Rukh Khan Movie: किंग खानचा 'जवान' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, गुन्हा दाखल

चित्रपट निर्माते मणिकम नारायणन यांनी टीएफपीसीमध्ये अॅटली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
shah rukh khan News
shah rukh khan NewsInstagram @iamsrk

Jawan Controversy: शाहरुख खानने त्याच्या आगामी चित्रपट 'जवान'मध्ये अॅटलीसोबत काम केले आहे. हा चित्रपट आता अडचणीत आल्याचे समोर आले आहे. अॅटलीचा तमिळ चित्रपट पेरारसूमधील कथेची नक्कल जवान चित्रपटामध्ये केल्याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. या अहवालात तक्रारदार म्हणून तमिळ चित्रपट निर्माते मणिकम नारायणन यांचे नाव आहे. तमिळ फिल्म प्रोड्युसर कौन्सिलमध्ये अॅटली यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

shah rukh khan News
Rakul Preet Singh: रकुलने पुन्हा बॉलिवूडला सांगितली बॉयकॉटची कारणे...

चित्रपट निर्माता अॅटलीच्या विरोधात निर्माते परिषदेत चोरी केल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाहरुख खान असलेल्या या चित्रपटाची कथा 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या विजयकांतच्या 'पेरारसू' सारखीच आहे, असे अहवालात म्हटले आहे. चित्रपट निर्माते मणिकम नारायणन यांनी टीएफपीसीमध्ये अॅटली यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 'जवान' आणि 'पेरारसू' यांच्या कथा सारख्याच असल्याचा आरोप केला आहे. टीएफपीसी बोर्ड सदस्य 7 नोव्हेंबरनंतर तक्रारीची चौकशी करणार आहेत. कथेचे हक्क निर्माता मणिकम नारायणन यांच्याकडे आहेत.

शाहरुख खान 'जवान'मध्ये दुहेरी भूमिका साकारत आहे. 2006चा तमिळ चित्रपट पेरारसूमध्ये, विजयकांतने बालपणात विभक्त झालेल्या जुळ्या भावांची दुहेरी भूमिकाही साकारली होती. या चित्रपटात तमिळ कलाकार नयनतारा, विजय सेतुपती, योगी बाबू आणि प्रियामणी यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. अॅटलीने पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शित केला आहे. (Shah Rukh Khan)

शाहरुख खान 'झिरो' चित्रपटामध्ये शेवटचा दिसला होता. हा चित्रपट 2018 मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांच्याही भूमिका होत्या. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फ्लॉप ठरला होता. शाहरुख खानचे 2023 मध्ये तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. 'पठाण' 25 जानेवारी 2023 रोजी, 'जवान' 2 जून, 2023 रोजी आणि 'डंकी' 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Movie)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com