Rakul Preet Singh: रकुलने पुन्हा बॉलिवूडला सांगितली बॉयकॉटची कारणे...

रकुलने बऱ्याचदा बॉयकॉट ट्रेंडवर भाष्य केले आहे, तिच्या या भाष्यमुळे बऱ्याचदा ती चर्चेत आली आहे, ती पुन्हा एकदा या भाष्यामुळे चर्चेत आली आहे.
Rakul Preet Singh
Rakul Preet SinghInstagram @rakulpreet
Published On

Rakul Preet Singh Controversy: बॉयकॉट ट्रेंड (Boycott) आणि दाक्षिणात्य चित्रपटांकडे (Tollywood) प्रेक्षकांचा वाढता कल पाहता बॉलिवूड इंडस्ट्री संपली अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. प्रेक्षकांनीही बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवकेली दिसत आहे. ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. मात्र चित्रपट बॉक्स ऑफिसवर आलेला ‘विक्रम वेधा’, ‘थँक गॉड’, ‘डॉक्टर जी’ हे चित्रपट फारसे चालले नाही. बॉलिवूडच्या क्रेझ कमी होत असल्याची चर्चा सुरु असताना अभिनेत्री रकुल प्रीतने यावर भाष्य केले आहे. (Bollywood Film)

Rakul Preet Singh
Bigg Boss Marathi 4: महेश मांजरेकरांनी केले विकास आणि किरणचे कौतुक, तर यशश्रीचे उघडले कान

रकुलने (Rakul Preet Singh) एका कार्यक्रमात उपस्थिती लावली होती, तेव्हा ती ती बॉलिवुडविषयी म्हणते, "लॉकडाऊनने प्रेक्षक पाश्चिमात्य, कोरियन, प्रादेशिक आशयावर चर्चा करत आहेत कारण सर्व जगातील सर्वोत्कृष्ट आशय बरेच एकसारखे आले आहेत. तिला ठामपणे वाटतं, सिनेमा ही भावनांची भाषा आहे, सीमांची नाही. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यात श्रीदेवी आणि तब्बू सारख्या दिग्गज अभिनेत्रींनी काम केलं आहे."

Rakul Preet Singh
Urfi Javed: 'एमटीव्ही स्प्लिट्सविला X4'मध्ये उर्फी जावेद घेणार तिच्या जोडीदाराचा शोध

“हा एक मोठा टप्पा आहे. जो आशय चालत नाही त्यावर निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना लिहायला आवडते. परंतू सर्वांनाच यामागे अपार कष्ट घ्यावे लागतात. आपण ज्या दाक्षिणात्य चित्रपटांबद्दल बोलतो ते इथे प्रदर्शित होत आहेत आणि इथे हिट होत आहेत. बाकीचे चित्रपट इथे प्रदर्शित होत नाहीत आणि त्यांची म्हणावी इतकी कमाई ही होत नाही. महामारीनंतर प्रेक्षकांची आवड निवड बदलली आहे. हे फक्त दाक्षिणात्य आणि बॉलिवूडबद्दल नसून प्रेक्षकांना आता लार्जर दॅन लाईफ चित्रपटाची गरज आहे.”

Rakul Preet Singh
Maharashtra Theater: रंगभूमी दिनानिमित्त नाट्यरसिकांना सरकारचे खास गिफ्ट, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा

मध्यंतरी रकुलने बॉयकॉटवर भाष्य केले असून २००९ मध्ये रकुलने कन्नड चित्रपट ‘गिली’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. सोबतच तिने बऱ्याच तेलुगू, हिंदी आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. २०१४ साली तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com