Maharashtra Theater: रंगभूमी दिनानिमित्त नाट्यरसिकांना सरकारचे खास गिफ्ट, सांस्कृतिक मंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह उत्तम व्हावी, यामधील सुविधा परिपूर्ण व्हाव्यात यासाठी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योजना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
Theater
TheaterSaam Tv
Published On

मराठी नाटक हे नाट्य रसिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे . मराठी प्रेक्षकांचे आणि नाटकाचे नाते खुपच जुने आणि घनिष्ट आहे. मराठी रंगभूमीला आधिकाधिक समृद्ध करण्याचे मोलाचे योगदान अनेक दिग्गज कलाकारांनी केले आहे. आज मराठी चित्रपटसृष्टीला शतकाहून अधिक काळ लोटला आहे.

आजही इंटरनेटच्या जगात प्रेक्षक नाटक पाहाण्याकडे सर्वाधिक वळत आहेत. हे महत्वाचे आहे. आज रंगभूमीच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सर्वात मोठी घोषणा केली आहे.

Theater
Marathi Movies: 'हर हर महादेव' चित्रपटाला वाढतोय विरोध; काय होतोय आरोप, सांगलीत आंदोलन

त्यांनी आपल्या ट्विटरवर एक पोस्ट शेअर करत म्हटले आहे की, ‘महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृह उत्तम व्हावी, यामधील सुविधा परिपूर्ण व्हाव्यात यासाठी या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त योजना करण्याचा निर्णय आज सह्याद्री अतिथीगृह येथील आयोजित बैठकीत घेतला.’ त्यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून मनोरंजन क्षेत्रासाठी ही आनंदाची बातमी दिली आहे.

Theater
Bigg Boss Marathi 4: विकास आणि अपूर्वामध्ये पुन्हा एकदा जुंपली, टास्क दरम्यान टीममध्ये तुफान राडा

अनेक नाटकातील जेष्ठ कलाकार सरकारी दरबारी उघडपणे बोलायचे. आज महाराष्ट्रात मुख्य शहरांव्यतिरिक्त इतर शहरातही नाटकगृहे आहेत. परंतू त्यांची स्थिती म्हणावी इतकी चांगली नाही. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशांत दामले, भरत जाधव आणि इत्यादी जेष्ठ कलाकार नाट्यगृहातील अडचणींबद्दल आपले मत परखडपणे व्यक्त करत असतात.

Theater
Varun Dhawan : बॉलिवूडच्या एनर्जिटिक अभिनेत्याला गंभीर आजार, स्वतःच केला मोठा खुलासा

आज कोरोना काळानंतर पुन्हा एकदा मनोरंजनसृष्टी नव्याने उभारी घेत आहे. रंगभूमीवर बरेच नाटकं येत आहेत.काही जुनी नाटक सध्या नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे, तसेच येत्या काळात दर्जेदार नाटकांसाठी प्रेक्षकवर्गही उत्सुक आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com