Shah Rukh Khan Chats Viral: प्लीज माझ्या मुलाची काळजी घ्या, शाहरुखने मेसेज केल्याचा समीर वानखेडेंचा दावा, व्हाट्सअॅप चॅटिंग आले समोर

Sameer Wankhede File Petition: आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
Sameer Wankhede News, Aryan Khan Latest News
Sameer Wankhede News, Aryan Khan Latest NewsSaam Tv

Sameer Wankhede Moves Bombay HC: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. याप्रकरणी त्यांनी रिट पिटीशन दाखल केली आहे. व्हॅकेशन कोर्टात त्यांनी ही याचिका दाखल केली आहे.

यामध्ये न्यायमूर्ती शर्मिला देशमुख, न्यायमूर्ती अरिफ एस डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर तातडीने सुनावणीची मागणी केली आहे. समीर वानखेडेंची मागणी हायकोर्टाकडून मान्य झाली असून आजच याप्रकरणी सुनावणी होणार आहे. विधिज्ञ रिझवान मर्चंट, आबाद पोंडा समीर वानखेडे यांची बाजू मांडणार आहेत.

Sameer Wankhede News, Aryan Khan Latest News
Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते मालिकेचे ९९९ भाग पूर्ण; काय असेल मालिकेत नवा ट्विस्ट?

दिल्ली उच्च न्यायालयाने 22 मे पर्यंत वानखेडे यांना CBI चौकशी पासून दिलासा दिला आहे. कोर्टानं CBI वकिलांना सूचना नोटीस जारी केली आहे. यावर CBIचे वकीलही युक्तिवाद करणार आहेत.

आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर शाहरुख खान आणि समीर वानखेडे यांच्यात संभाषण झालं होत. त्यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट्स समोर आले आहेत. शाहरुखने मुलाची काळजी वाटत असल्याचं वानखेडे यांना कळवल होत. तर समीर वानखेडे यांनीही आर्यनबाबत काहीही चुकीचं होणार नाही याची हमी दिली होती.

समीर वानखेडे यांनी गोव्याला जाणाऱ्या कोर्डीलिया क्रूझवर छापा टाकत ड्रग प्रकरणात बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक केली होती. याप्रकरणी आर्यन खानला तुरुंगात जावे लागले होते.

Sameer Wankhede News, Aryan Khan Latest News
Sameer Wankhede News: समीर वानखेडेंचा पाय आणखी खोलात? उद्या सीबीआय चौकशी होणार

त्याची सुटका देखील झाली आहे. पण आता हे प्रकरण तब्बल 19 महिन्यांनंतर पुन्हा चर्चेत आले आहे. समीर वानखेडे आणि इतर काही जणांनी मिळून आर्यन खानकडे 25 कोटींची मागणी केल्याचा आरोप आहे.

आता भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे समीर वानखेडे अडचणीत आले आहेत. सीबीआयने वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहेत. याप्रकरणी सीबीआयने समीर वानखेडे यांच्या गोरेगाव येथील घरावर छापा देखील टाकला होता. तसंच सीबीआयने समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे मोबाईल जप्त केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com