Aai Kuthe Kay Karte Update: आई कुठे काय करते मालिकेचे ९९९ भाग पूर्ण; काय असेल मालिकेत नवा ट्विस्ट?

Aai Kuthe Kay Karte Completed 999 Episode: आई कुठे काय करते मालिकेचे ९९९ एपिसोड झाले असून आज या मालिकेचा १००० भाग प्रदर्शित होणार आहे.
Aai Kuthe Kay Karte Serial Update
Aai Kuthe Kay Karte Serial UpdateInstagram

Aai Kuthe Kay Karte 1000 Episode: 'आई कुठे काय करते' हि मालिका महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका आहे. टीआरपी रेटिंगमध्ये देखील ही मालिका टॉपला आहे. या मालिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि त्याचमुळे ही मालिका यशस्वी झाली आहे.

'आई कुठे काय करते' ही मालिका तीन वर्षांपूर्वी स्टार प्रवाह या वाहिनीवर प्रसारित झाली. मालिकेच्या शीर्षकावरून आपल्याला लक्षात येते की ही मालिका आईवर आधारित आहे. आईकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन आपल्याला या मालिकेने दिला. आई कुठे काय करते मालिकेचे ९९९ एपिसोड झाले असून आज या मालिकेचा १००० भाग प्रदर्शित होणार आहे. (Latest Entertainment News)

Aai Kuthe Kay Karte Serial Update
Sankarshan Karhade Post: अभिनेता संकर्षण कऱ्हाडेवर हल्ला; पोस्ट शेअर करत दिली वेगळीच हिंट

९९९ भाग पूर्ण करणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अनेक ट्विस्ट आणि टर्न्स या मालिकेत पाहायला मिळाले. अनिरुद्ध आणि अरुंधतीचं नातं. प्रत्येक नात्याला हवी असणारी स्पेस आणि किंमत आपल्याला या मालिकेतून आपल्याला पाहायला मिळालं.

या मालिकेतील आजच्या १००० व्या भागात आपल्याला अरुंधतीला एक नवीन संधी मिळणार असल्याचे मिळणार आहे. अरुंधतीला वल्ड टूरची ऑफर आली आहे. पुढचे काही दिवसात जगातील प्रतिष्ठित शहरांमध्ये गाण्याची संधी अरुंधतीला मिळाली आहे. आशुतोष ही बातमी अरुंधतीला सांगतो. यश गुलाब देऊन तिचे अभिनंद करतो. उपस्थित सगळे टाळ्या वाजवून तिचे अभिनंदन करतात.

अरुंधतीचे पात्र साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरनेनुक्तीच तिच्या सोशल मीडियावर काही पोस्ट केल्या होत्या. या पोस्टमध्ये ती ऑस्ट्रेलियाला जात असल्याचे तिने सांगितले होते. त्यामुळे रील आणि रिअल जीवनात अरुंधती परदेशवारी करत आहे.

अरुंधतीसह या मालिकेत गेली १००० भाग मिलिंद गवळी, अपूर्व गोरे, अभिषेक देशपांडे, किशोर महाबोले, निरंजन कुलकर्णी, अर्चना पाटकर हे कलाकार आहेत. तर रुपाली भोसले, गौरी कुलकर्णी, जयंत सावरकर, आशिष कुलकर्णी, मयूर खांडगे, पूनम चांदोरकर, रसीक राज, इला भाटे, ओमकर गोवर्धन हे कलाकार आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com