Sejal Pawar: प्रणित मोरेच्या शोमध्ये ३७० बिर्याणीनंतर मृतदेहाच्या प्रायव्हेट पार्टबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्यामुळे ट्रोल होत असलेली सेजल पवार पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी तिचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमध्ये ती तिच्या मुंबईतील प्रतिष्ठीत केईएम रुग्णालय कॉलेजला चिंदी बोलत आहे.
सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरलेली सेजल पवार नव्या वादात अडकली आहे. तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला असून त्यामध्ये मुंबईतील प्रतिष्ठित किंग एडवर्ड मेमोरियल (KEM) रुग्णालय आणि तेथील वातावरणाबाबत केलेल्या वक्तव्यांवरून अडचणीत सापडली आहे.
अल्फा कल्चर या पेजवर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये सेजल पवारने KEM रुग्णालयाला "चिंदी" म्हणते आणि बोलते माझं कॉलेज कधीच कोणतं ब्रॉण्डला प्रेझेंट करु शकत नाही कारण ते खूप चिंदी आहे. तसेच रुग्णालयातील प्राध्यापक "टॉक्सिक" असल्याचे ती सांगते. एवढंच नाही तर, माझं कॉलेज हे शवविच्छेदनासाठी प्रसिद्ध असल्याचं देखील ती या व्हिडिओमध्ये बोलते.
या व्हिडिओवर वैद्यकीय विद्यार्थी, KEM चे माजी विद्यार्थी आणि आरोग्य क्षेत्रातील अनेक व्यावसायिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी KEM हे देशातील सर्वात प्रतिष्ठित सार्वजनिक वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवा संस्थांपैकी एक असल्याचे नमूद करत संस्थेबाबत अशा प्रकारच्या टिप्पणी अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे, जेव्हा काही दिवसांपूर्वीच सेजल पवार प्राणित मोरे यांच्या शोमधील एका चर्चेमुळे टीकेचे धनी ठरली होती. त्या कार्यक्रमात पुरुष मृतदेहांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून सोशल मीडियावर नाराजीच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेकांनी त्या वक्तव्यांना असंवेदनशील म्हणत जबाबदारीची मागणी केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.