Savalyachi Janu Savali: भैरवी आणि सावली समोरासमोर येणार; 'सावळ्याची जणू सावली'मध्ये घडणार गौप्यस्फोट

savalyachi janu savali: झी मराठीवरील ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत भैरवी आणि सावली आमनेसामने येणार आहेत. गुरू-शिष्य संघर्षाचा नवा ट्विस्ट प्रेक्षकांना थक्क करणार.
Savalyachi Janu Savali
Savalyachi Janu SavaliSaam Tv
Published On

savalyachi janu savali: झी मराठीवरील लोकप्रिय मालिकेत 'सावळ्याची जणू सावली'मध्ये नवीन ट्विस्ट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपासून सावलीच्या आयुष्यात मोठ्या उलथापालथ दिसत आहे आणि आता तिच्या सर्वात मोठ्या सत्याबद्दल सर्वांना माहिती झाली आहे. सावलीने वर्षानुवर्षे भैरवीच्या मुलीसाठी तारासाठी गाणे गायले, पण हे सत्य तिने सारंग व इतरांपासून लपवून ठेवले होते. हे सत्य जाणून घेतल्यानंतर सारंगने ते जगासमोर आणले व सावलीला आपल्या खऱ्या ओळखीचा मान दिला.

आता मालिकेत पुढचा मोठा ट्विस्ट असा आहे की भैरवी आणि सावली समोरासमोर येणार आहेत. झी मराठी वाहिनीने सोशल मीडियावर शेअर केलेल्या प्रोमोमध्ये भैरवी जगन्नाथला म्हणते की तिने सर्व काही गमावले आहे आणि आता ती जगन्नाथला सोडणार नाही. तसेच सावली तिथे येऊन भैरवीला थेट उत्तर देते आणि संघर्ष सुरू होतो. प्रोमोमध्ये सावली भैरवीला म्हणते: “खबरदार माई, माझ्या घरच्यांबद्दल एक शब्दही बोललात ना तर…” आणि भैरवी म्हणते: “तर..? हे युद्ध सुरू आहे.” त्यानंतर सावली पुन्हा म्हणते: “हे युद्ध गुरू आणि शिष्यामधील असेल तुमचा अहंकार की माझी भक्ती?” असा तिला आव्हानही देते.

Savalyachi Janu Savali
Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप ?; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

या नाट्यमय समोरासमोर परिस्थितीमुळे प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता वाढली आहे. भैरवीचा अहंकार आणि सावलीची भक्ती यांच्यातील संघर्ष पुढे कसा रंगणार हे पाहणे आता मालिकेच्या चाहत्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. शिवाय सावली आणि जगन्नाथ यांच्यातील नातंही उत्सुकतेचं कारण ठरले आहे. कारण जगन्नाथ सावलीला मुलगी समजतो आणि सावलीदेखील त्याला वडील मानते.

Savalyachi Janu Savali
Oscar: ऑस्करमध्ये भारतीय चित्रपटांचा डंका; 'कांतारा चॅप्टर १' आणि 'तन्वी द ग्रेट' ऑस्करच्या स्पर्धेत

हा ट्विस्ट नुसता वाद राहणार नाही तर भावनिक संघर्ष आणि पात्रांची खरी परीक्षा म्हणून पुढे दिसणार आहे. यामुळे प्रेक्षकांना मालिकेचा पुढचा भाग बघण्यासाठी अधिक उत्सुकता निर्माण झाली आहे. सावल्याची जणू सावली ही मालिका रोज

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com