Bollywood Breakup: तारा आणि वीरनंतर बी-टाऊनच्या आणखी एका कपलचं ब्रेकअप ?; दोन वर्षाचं रिलेशन तुटलं...

Khushi and Vedang: श्रीदेवीची धाकटी मुलगी खुशी कपूरचे वेदांग रैनाशी गेल्या काही काळापासून नाव जोडले जात होते. परंतु आता असे वृत्त आहे की त्यांचे ब्रेकअप झाले आहे.
Khushi and Vedang
Khushi and VedangSaam Tv
Published On

Khushi and Vedang: २०२६ हे वर्ष बॉलिवूडमधील अनेक कपलचे ब्रेकअप होत आहे. तारा सुतारिया आणि वीर पहाडिया यांच्या ब्रेकअपच्या बातम्यांदरम्यान, आता खुशी कपूर आणि वेदांग रैनाचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या, परंतु त्यांच्या ब्रेकअपची बातमी धक्कादायक आहे.

एकत्र कारकिर्दीची सुरुवात

जोया अख्तरच्या द आर्चीजमध्ये त्यांनी अभिनय केला होता. या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटानंतर त्यांच्या नात्याबद्दलच्या अफवा पसरू लागल्या. गेल्या दोन वर्षांत, ते अनेक वेळा कार्यक्रम, पार्ट्या आणि फॅमिली ओकेशन्समध्ये एकत्र दिसले आहेत. तसेच, फिल्मफेअरच्या अहवालानुसार, त्यांनी आता त्यांचे नाते संपवले आहे. पण, या विषयावर दोघांकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. दोघांनीही कधीही नात्याची पुष्टी केलेली नसली तरी, ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे चाहत्यांना कळले होते.

Khushi and Vedang
Vicky-Katrina Baby Boy: आमच्या बाळाचं नाव काय? विक्की-कटरीनाने शेअर केलं त्यांच्या मुलाचं क्यूट नाव

खुशी थोडी लाजाळू आहे

फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत, वेदांगने खुशीच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलताना म्हटले की ती त्याच्यासारखीच इंट्रोवर्ट आहे. त्यांनी असेही नमूद केले की खुशी थोडी लाजाळू आणि शांत स्वभावाची आहे. पण ती मनाने खूप चांगली आहे.

Khushi and Vedang
Krantijyoti Vidyalay: 'क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; सहा दिवसात गाठला ५ कोटींच्या टप्पा

कामाबद्दल बोलायचे झाले तर, खुशी करिश्मा तन्ना अभिनीत 'मॉम २' मध्ये दिसणार आहे. श्रीदेवी मुख्य भूमिकेत असलेल्या पहिल्या भागाला चांगला प्रतिसाद मिळाला. इम्तियाज अलीच्या चित्रपटात शर्वरी वाघसोबत वेदांग राणा दिसणार आहे. या चित्रपटात दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाह देखील आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com