Actors struggle: एकेकाळचा प्रसिद्ध अभिनेता, अनेक वर्ष इंड्रस्ट्रीत कामच मिळालं नाही; अखेर शेती करून फेडलं कोट्यवधींचं कर्ज

Actors struggle: 'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेता राजेश कुमारने काही वर्षांपूर्वी अभिनय सोडून गावात स्थायिक होण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सेंद्रिय शेती करत त्याचं राहिलेलं कर्ज फेडलं आहे.
rajesh kumar
rajesh kumarSaam Tv
Published On

Actors struggle: 'साराभाई व्हर्सेस साराभाई'मधील रोशेशच्या प्रसिद्ध भूमिकेसाठी ओळखला जाणारा अभिनेता राजेश कुमार, काही वर्षांपूर्वी अभिनय सोडून शेती करण्याचा निर्णय घेतल्यामुळे चर्चेत होता. चित्रपटसृष्टीतील सुखसोयी सोडून, ​​हा अभिनेता बिहारमधील आपल्या गावी परतला आणि त्याने सेंद्रिय शेती केली. त्यांने एक ॲप सुरू केला आणि सेंद्रिय शेतमाल विकण्याचा प्रयत्न केला आणि एकदा तर आपल्या मुलाच्या शाळेबाहेर भाजी विकताना देखील दिसला. त्यांने यापूर्वी उघड केले होते की त्याच्यावर २ कोटी रुपयांचे कर्ज होते. आता त्याने खुलासा केला त्याच्या दोन बहिणी, ज्या २५ वर्षांहून अधिक काळ अमेरिका आणि फिनलंडमध्ये स्थायिक होत्या त्यांनी आपल्या चांगल्या पगाराच्या नोकऱ्या सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे त्यांनी त्यांचं कर्जदेखील फेडलं आहे.

अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आली

बॉलिवूड बबलशी बोलताना राजेश कुमार म्हणाला "मी तुम्हाला एक खूप रंजक गोष्ट सांगतो. जेव्हा मला शेतीमध्ये रस निर्माण झाला, तेव्हा माझ्या बहिणींनी ज्या गेल्या २५ वर्षांपासून अमेरिका आणि फिनलंडच्या नागरिक आहेत माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी जानेवारीमध्ये माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या वेळी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीने अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आली.

rajesh kumar
Actress Father Death: तारक मेहता फेम'दयाबेन'च्या वडिलांचं निधन; अंत्यसंस्कारावेळी अभिनेत्रीने फोडला हंबरडा, VIDEO

अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आली

बॉलिवूड बबलशी बोलताना राजेश कुमार म्हणाला "मी तुम्हाला एक खूप रंजक गोष्ट सांगतो. जेव्हा मला शेतीमध्ये रस निर्माण झाला, तेव्हा माझ्या बहिणींनी ज्या गेल्या २५ वर्षांपासून अमेरिका आणि फिनलंडच्या नागरिक आहेत माझ्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. या वर्षी जानेवारीमध्ये माझ्या ५० व्या वाढदिवसाच्या वेळी माझ्यापेक्षा चार वर्षांनी मोठ्या असलेल्या माझ्या मोठ्या बहिणीने अमेरिकेतील नोकरी सोडून भारतात आली.

rajesh kumar
Shivali Parab: हॉटनेसचा कहर; कल्याणच्या चुलबुलीचा ऑस्ट्रेलियन बोल्ड लूक

गावात अजूनही २जी इंटरनेट आहे

तो म्हणाला, "आता लोक फोन करून तक्रार करतात की आमच्या गावात इंटरनेट व्यवस्थित चालत नाही. आम्ही अजूनही २जी कनेक्टिव्हिटीवर आहोत. जेव्हा त्यांनी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, तेव्हा त्यांना सांगण्यात आले की ५जी यायला बराच वेळ लागेल."

राजेशवर १०-१५% कर्ज आहे

राजेशने आपला शेतीचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करताना आलेल्या आर्थिक अडचणींबद्दलही सांगितले. मित्रांना ताज्या, सेंद्रिय भाज्या पुरवण्याच्या नादात २ कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला होता. मी आता त्या आर्थिक संकटातून बाहेर आलो आहे. माझ्यावर फक्त १०-१५% कर्ज शिल्लक आहे. लवकरच, मी लोकांसाठी काहीतरी नवीन करणार आहे. जे शेतीशी संबंधित असेल, पण काहीतरी वेगळे असेल."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com