Sikandar : सलमानचा 'सिकंदर' मालामाल झाला, रिलीजआधीच ८० टक्के वसूल

Salman Khan :सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाने रिलीज आधीच १६५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कसे ते जाणून घेऊयात.
Salman Khan
sikandar Saam Tv
Published On

बॉलिवडूचा अभिनेता भाईजान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'सिकंदर'मुळे चांगला चर्चेत आहे. 'सिकंदर'मध्ये (Sikandar ) सलमान खान (Salman Khan) आणि साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदाना एकत्र झळकणार आहेत. 'सिकंदर' चित्रपट 28 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच 'सिकंदर' चित्रपटाचे पहिले गाणे 'जोहरा जबीं' रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

रिलीज आधीच कोट्यावधींची कमाई

'सिकंदर'चा बजेट 180 कोटी आहे. चित्रपटाने रिलीजआधीच तब्बल 165 कोटींची कमाई केली आहे. 'सिकंदर'ने एवढी मोठी कमाई चित्रपटाच्या राईट्समधून केली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'सिकंदर' चित्रपटाने ओटीटी, म्युजिकल आणि सॅटेलाइट राइट्सच्या माध्यमातून 165 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे भाईजानच्या 'सिकंदर' चित्रपटाने रिलीजआधीच 80 टक्के बजेट वसूल केले आहे.

ओटीटी रिलीज

सलमान खानच्या 'सिकंदर' चित्रपटाचे ओटीटी राइट्स नेटफ्लिक्सने विकत घेतले आहेत. तब्बल 85 कोटींना नेटफ्लिक्सने राइट्स खरेदी केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 350 कोटींची कमाई केली तर ही डील 100 कोटींपर्यंत जाऊ शकते. 'सिकंदर' चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्स 50 कोटींना विकत घेतले असून झी म्युझिक कंपनीसोबत 30 कोटींची डील करण्यात आली आहे.

'सिकंदर'च्या टिझर आणि 'जोहरा जबीं' गाण्यामुळे चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. गाण्यातून रश्मिका आणि सलमान खानची केमिस्ट्री पाहून चाहते घायाळ झाले आहेत. 'सिकंदर' चित्रपटाची निर्मिती साजिद नाडियाडवाला यांनी केली आहे. रश्मिका आणि सलमानसोबतच चित्रपटात काजल अग्रवाल, प्रतीक बब्बर, शरमन जोशी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Salman Khan
Sai Tamhankar : सही रे सई...! लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटीच्या यादीत आघाडीचे स्थान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com