Salman Khan: सलमान खानचा 'सिकंदर' थलापती विजयच्या 'सरकार' चित्रपटाचा रिमेक? 'या' अभिनेत्याने केला मोठा दावा

Salman Khan Sikhandar Movie: सलमान खानचा आगामी 'सिकंदर' चित्रपट चित्रपट ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. आता एका बॉलिवूड अभिनेत्याने म्हटले आहे की 'सिकंदर' हा थलापती विजयच्या 'सरकार' चित्रपटाचा रिमेक आहे.
salman khan sikandar remake of thalapathy vijay tamil film sarkar
salman khan sikandar remake of thalapathy vijay tamil film sarkarSaam Tv
Published On

Salman Khan Sikhandar Movie: बॉलिवूडचा भाईजान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलमान खानच्या चाहत्यांना यावर्षी ईदच्या दिवशी एक उत्तम ईद भेट मिळणार आहे. सलमान लवकरच 'सिकंदर' नावाचा चित्रपट घेऊन येत आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे, त्यानंतर या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. काही लोकांना हा टीझर आवडला आहे,तर, काही लोकांना हा टीझर अजिबात आवडला नाही. त्यापैकी एक नाव आहे अभिनेता आणि चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान उर्फ ​​केआरके यांचे.

केआरकेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर एक पोस्ट केली आहे आणि सलमानच्या 'सिकंदर' चित्रपटावर टीका केली आहे. तो असा दावा करतो की 'सिकंदर' हा चित्रपट दक्षिणेतील सुपरस्टार थलापती विजय यांच्या 'सरकार' चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटाचा टीझर २७ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला. तेव्हापासून काही लोक विजय आणि सलमानच्या सिकंदर चित्रपटातील काही दृश्ये सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

salman khan sikandar remake of thalapathy vijay tamil film sarkar
Sayali Sanjeev: सायली संजीवची मालिका विश्वात ग्रँड रिएंट्री; 'या' अभिनेत्यासोबत झळकणार नव्या मालिकेत

केआरकेने काय लिहिले?

तोच सीन पोस्ट करत केआरकेने लिहिले, “आता हे निश्चित झाले आहे की ‘सिकंदर’ हा थलापती विजयच्या ‘सरकार’ या तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे.”दरम्यान, सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या दोन्ही चित्रपटांच्या दृश्यांमध्ये फरक आहे. आता केआरकेचे हे विधान किती खरे आहे हे चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच कळेल.

salman khan sikandar remake of thalapathy vijay tamil film sarkar
Marathi Serial: झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर करून दिली माहिती

सलमान खान ॲक्शन अवतारात दिसणार आहे.

एआर मुरुगादोस दिग्दर्शित 'सिकंदर' चित्रपटात सलमानसोबत रश्मिका मंदान्ना दिसणार आहे. प्रभासच्या 'बाहुबली' चित्रपटात कटप्पाची भूमिका साकारणारा अभिनेता सत्यराज या चित्रपटाचा खलनायक आहे. या चित्रपटात सलमान खान जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसणार आहे, याची झलक नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये पाहायला मिळाली आहे. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करतो हे पाहणे रंजक ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com