Sayali Sanjeev: सायली संजीवची मालिका विश्वात ग्रँड रिएंट्री; 'या' अभिनेत्यासोबत झळकणार नव्या मालिकेत

Sayali Sanjeev: झी मराठीवर २०१६ साली गाजलेल्या काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरातून प्रसिद्ध झालेली गौरी म्हणजेच सायली संजीव तब्बल ४ वर्षांनंतर सायली मालिकाविश्वात धमाकेदार पदार्पण करणारा आहे.
Sayali Sanjeev
Sayali SanjeevSaam Tv
Published On

Sayali Sanjeev: झी मराठीवर २०१६ साली गाजलेल्या काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरातून प्रसिद्ध झालेली गौरी म्हणजेच सायली संजीव फार कमी काळात प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री झाली आहे. तिच्या अभिनय प्रेक्षकांना पाहायला फार आवडतो आता लवकरच सायली तब्बल ४ वर्षांनंतर सायली मालिकाविश्वात धमाकेदार पदार्पण करणारा आहे.

२०१६ नंतर सायली संजीवने शुभमंगल ऑनलाईन या कलर्स मराठीवरील मालिकेत २०२१ साली काम केले होते. त्यानंतर तब्बल चार वर्षांनी सायली स्टार प्रवाहवरील नव्या मालिकेतून छोट्या पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतच स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्याच्या मंचावर या नव्या मालिकेची घोषणा करण्यात आली आहे.

Sayali Sanjeev
Kangana Ranaut and Javed Akhtar: कंगना राणौत-जावेद अख्तर वाद ५ वर्षांनंतर संपला; अभिनेत्रीने सांगितले कसे झाले समेट

दरवर्षी स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळ्यात आगामी मालिकांची घोषणा करून त्यातील प्रमुख जोडीचा डान्स सादर केला जातो. नुकताच सायलीने पुरस्कार सोहळ्यात केलेल्या डान्स परफॉर्मन्सचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला. सायली बरोबर अभिनेता चेतन वडनेरेने या व्हिडीओमध्ये दिसत आहे. ही नवीन जोडी लवकरच स्टार प्रवाहच्या आगामी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Sayali Sanjeev
Marathi Serial: झी मराठीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने भावनिक पोस्ट शेअर करून दिली माहिती

या बातमीमुळे सायलीचे चाहते खुश आहेत. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत सायलीने ती लवकरच स्टार प्रवाहवरील मालिकेत काम करणार असल्याचे सांगितले होते. पण अजूनही या मालिकेबद्दल कोणतीही माहिती उघड करण्यात आली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com