Shraddha Kapoor: वयाच्या १६ व्या वर्षी श्रद्धाने नाकारली सलमान खानच्या चित्रपटाची ऑफर; भाईजानच्या फ्लॉप चित्रपटाचा तो किस्सा...

Shraddha Rejected Movie Offer: बॉलिवूडची श्रद्धा कपूर तिच्या 'स्त्री2' या चित्रपटामुळे अजुनही प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. या चित्रटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. या अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं.
Shraddha Rejected Movie Offer
Shraddha Kapoor Birthday Today latest news saam tv
Published On

बॉलिवूडची श्रद्धा कपूर तिच्या 'स्त्री2' या चित्रपटामुळे अजुनही प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. या चित्रटाने बॉक्स ऑफीसवर चांगलीच कमाई केली. या अभिनेत्रीने तिच्या प्रत्येक चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या अभिनेत्रीने सगळ्यात पहिला चित्रपट बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबत केला आहे. मात्र त्यात श्रद्धा कपूरला जास्त फेम मिळालं नव्हतं. पण तुम्ही चित्रपटांच्या ऑफर्सची यादी पाहाल तर सलमान खानने सुद्धा अभिनेत्री श्रद्धा कपूरला अप्रोच केले होते.

Shraddha Rejected Movie Offer
Ameesha Patel: 'कहो ना प्यार है २' चित्रपट येणार? अमिषा पटेलने सांगितले, 'राकेश अंकल आणि...'

बॉलिवूडच्या श्रद्धा कपूरचा पहिला चित्रपट म्हणजे 'तीन पत्ती' हा आहे. या चित्रपटात काम केल्यावर हीला फार प्रसिद्ध मिळाली नव्हती. कारण हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर फारसा चालला नव्हता. मात्र त्यातही श्रद्धा कपूरला फिल्मफेयर अवॉर्डमध्ये नॉमिनेट केलं होतं. पुढे या अभिनेत्रीने 'लव का दी एंड' या चित्रपटात काम केलं. मात्र त्यातही हिला फारसं यश मिळालं नाही. मग एक चित्रपट तिच्यासाठी सगळ्यात बेस्ट आणि लकी ठरला तो म्हणजे 2013 चा 'आशिकी2'. या चित्रपटात श्रद्धाने आदित्य रॉय कपूरसोबत त्यांच्या प्रेयसीची आणि गायकीची भुमिका साकारली. या चित्रपटाने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.

सलमान खानला नकार

श्रद्धा कपूर तिच्या सौंदर्यामुळे तसेच तिच्या अभिनयामुळे सुद्धा तितकीच प्रसिद्ध आहे. हिचा जन्म 3 March 1987 झाला आहे. या अभिनेत्रीने तिच्या एका इंटरव्यूमध्ये म्हणाली होती की, 'मी १६ वर्षाची असताना अभिनेता सलमान खानने एक फिल्म ऑफर केली होती.' दरम्यान सलमान खान तेव्हा 'लकी: नो टाइम फॉर लव' या चित्रपटाची तयारी करत होता. त्यावेळेस श्रद्धा कपूरला त्याने कॉलेजमध्ये पाहिलं होतं. त्यादरम्यान जेव्हा श्रद्धा कपूरला या चित्रपटाच्या ऑफरबद्दल कळलं आणि तिना त्याला नकार दिला होता.

नकार देण्याच खरं कारण

श्रद्धा कपूरला जेव्हा या चित्रपटाची ऑफर आली तेव्हा तिने त्याला नकार दिला. याचं पहिलं कारण म्हणजे, श्रद्धाचं शिक्षण. या अभिनेत्रीने जर तिच्या १६ व्या वर्षी सलमान खानसोबत चित्रपट केला असता तर तिला प्रचंड फेम मिळालं असतं. त्यासोबत तिचं शिक्षण अर्धवट राहीलं असतं. तर श्रद्धाला त्यावेळेस तिच्या सक्सेसपेक्षा शिक्षण महत्वाचं होतं. त्यामुळे या अभिनेत्रीला सलमान खानला नकार दिला होता.

Shraddha Rejected Movie Offer
Salaman Khan: सलमान खान करणार पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत लग्न? ड्रमा क्वीन जुळवणार नवी जोडी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com