Salman Khan: 'कुछ हासिल करने के लिए...'; भाईजानने केलं जबरदरस्त ट्रान्सफॉर्मेशन, 'तो' फोटो होताय व्हायरल

Salman Khan Viral pics: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने वयाच्या ५९ व्या वर्षी शर्टलेस फोटो काढून चाहत्यांना चकित केले आहे. त्याने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की त्याच्या फिटनेसमुळे वय हा फक्त एक आकडा आहे.
Salman Khan Viral pics:
Salman Khan Viral pics:Saam Tv
Published On
Summary

५९ वर्षांचा सलमान खानने नविन फोटो पोस्ट केले.

त्याच्या फोटोमध्ये त्याचा फिटनेस दिसत आहे.

गलवान व्हॅलीच्या युद्धाची तयारी करत आहे.

Salman Khan Viral pics:  सलमान खान हा भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अभिनेता आहे जो त्याच्या अभिनयासह फिटनेससाठी जगभरात ओळखला जातो. लाखो लोकांच्या हृदयाचा ठोका असलेला सलमान खानला यापूर्वी त्याच्या वाढत्या वजनामुळे मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आहे. पण आता त्याच्यात इतका मोठा बदल झाला आहे की त्याचे फोटोपाहून चाहते थक्क झाले आहेत.

सोमवारी रात्री, भाईजानने सोशल मीडियावर त्याचे नवीन फोटो शेअर केले, यावरून असे दिसून आले की ५९ व्या वर्षांच्या सलमान खानची फिटनेस आजही उत्तम आहे. सलमान खानने खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये फिटनेस ट्रेंड सुरू केला. तो नियमितपणे त्याच्या चाहत्यांना त्याच्या फोटोंसह जिममध्ये जाण्यासाठी प्रेरित करतो. सोमवारी, त्याने असेच केले, त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर काही फोटो शेअर केले.

Salman Khan Viral pics:
Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास, मनोरंजनविश्वावर शोककळा

या फोटोंमध्ये सलमान जिम करताना दिसत आहे. त्याच्या ट्विटमधील फोटोंव्यतिरिक्त, सुपरस्टारने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "कुछ हासिल करने के लिए कुछ छोड़ना पडता है; वो भी हार न माने." सल्लू भाईचे हे फोटो पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत की त्याने वजन कसे कमी केले आहे आणि त्याचे शरीर पुन्हा आकारात कसे आले.

Salman Khan Viral pics:
Actor Controversy: 'साडीत छान दिसतेस...'; अभिनेत्याला सोशल मीडियावर मॅसेज करणं पडलं माहागात, पोलिस तक्रार दाखल

सलमान खानचा वर्कफ्रंट

सलमान खानचा आगामी चित्रपट "बॅटल ऑफ गलवान" आहे. चित्रपटातील सलमानचा लूक देखील समोर आला आहे. हा एक युद्ध नाट्यमय चित्रपट आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान लडाखच्या पश्चिम भागात झालेल्या प्रमुख युद्धांपैकी गलवानची लढाई ही एक होती. लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (LAC) असलेली गलवान खोरी भारत आणि चीन दोघांसाठीही सामरिकदृष्ट्या महत्त्वाची होती. त्यावर हा चित्रपट आधारित आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com