Salman Khan: 'या दु:खाच्या काळात'; पहलगाम हल्ल्यामुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला...
Salman Khan: काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या हल्ल्यात अभिनेता सलमान खानने आपल्या युनायटेड किंगडम (UK) दौरा रद्द केला आहे. सलमान खानने या निर्णयाची घोषणा करताना स्पष्टपणे सांगितले की, “या दु:खाच्या काळात थांबणं आणि थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे.” चाहत्यांनीही त्यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
सलमान खानचा हा यूके दौरा जून महिन्यात होणार होता, त्याचे लंडन, बर्मिंगहॅम आणि मँचेस्टर शहरांतील कार्यक्रम होणार होते. अनेक दिवसांपासून या टूरची तयारी सुरु होती आणि मोठ्या प्रमाणात तिकिट विक्री देखील सुरु आहे. मात्र, देशातल्या सुरक्षाव्यवस्थेवर आणि जनतेच्या भावना लक्षात घेता, सलमानने आपल्या टीमसोबत चर्चा करून हा दौरा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या टीमने अधिकृत निवेदनात म्हटलं आहे की, “सलमान खानला वाटतं की या काळात उत्सव साजरा करणं योग्य नाही.”
सलमान खान यांचं देशप्रेम आणि सामाजिक जाणीव यापूर्वीही अनेकवेळा दिसून आली आहे. त्याने कोविड काळात केलेली मदत, गरीबांसाठी विविध उपक्रम राबवले होते. सोशल मीडियावरही त्याच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे. युनायटेड किंगडममधील आयोजकांनी देखील सलमान खानच्या या निर्णयाचा आदर केला असून लवकरच दौऱ्याच्या नव्या तारखा जाहीर करण्यात असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.