
Nani Hits Back At Salman Khan: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने अलीकडेच बॉलिवूड आणि साउथ सिनेमाबाबत एक वक्तव्य केले होते, यामध्ये त्याने साउथच्या काही चित्रपटांबाबत प्रश्न उपस्थित केले होते. या वक्तव्यावर आता प्रसिद्ध तेलुगू अभिनेता नानीने ठाम प्रत्युत्तर दिले आहे. नानीने स्पष्ट शब्दांत सांगितले की, जर साउथचे सिनेमे चालले नसते, तर तिथले अभिनेते सुपरस्टार कसे झाले असते?
नानी म्हणाला की, प्रत्येक उद्योगामध्ये चढ-उतार येत असतात आणि केवळ काही अपयशामुळे संपूर्ण उद्योगावर टीका करणे योग्य नाही. त्याने यावेळी हेही नमूद केले की, साउथचे सिनेमे प्रेक्षकांशी थेट संवाद साधतात, म्हणूनच ते लोकांच्या मनात घर करतात. जर साउथचे चित्रपट खरोखरच अपयशी ठरले असते, तर प्रेक्षकांनी त्यांना पाठिंबा दिला नसता आणि कलाकार सुपरस्टार झाले नसते, असे नानीने ठामपणे सांगितले.
त्याने असेही सांगितले की, कोणत्याही चित्रपटाच सक्सेस हे केवळ बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नाही, तर प्रेक्षकांशी निर्माण होणाऱ्या भावनिक नात्यावर आधारित असते. नानीने सलमानच्या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया दिली असली, तरी त्याच्या बोलण्यात कुठेही टीकात्मक वक्तव्य नव्हत. त्याने केवळ साउथ इंडस्ट्रीच्या मेहनती आणि प्रेक्षकांच्या प्रेमाचे समर्थन केले आणि अभिमानाने आपल्या सिनेसृष्टीचा गौरव केला.
या वादामुळे बॉलिवूड आणि साउथ इंडस्ट्रीतील तुलना पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे. मात्र नानीसारख्या अभिनेत्याने संयमाने उत्तर देत, आपली बाजू मांडली आहे. सध्या नानीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. येत्या १ मेला त्याचा हिट ३ हा चित्रपट प्रदर्शित होत असून नानी या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान व्यस्थ आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.