Rohit Shetty House Firing case
Rohit Shetty House Firing caseSaam Tv

Rohit Shetty House Firing: 'पुढच्या वेळी, छातीवर गोळी...'; रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी कोणी घेतली?

Rohit Shetty House Firing case: 'सिंघम' फेम दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत पुणे पोलिसांनी काही संशयितांना अटक केली आहे. दरम्यान, हल्ल्याची जबाबदारी स्वीकारणारी एक पोस्ट व्हायरल झाली आहे.
Published on

Rohit Shetty House Firing case: शनिवारी रात्री उशिरा, दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आला. तपास वेगाने सुरू आहे. काही संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुंबई गुन्हे शाखेतील सूत्रांनी सांगितले की, रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार घटनेत मोठ्या गँगस्टरचा हात असल्याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेणारी एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली. हा दावा लॉरेन्स बिश्नोई टोळीतील एका सदस्याने केला असल्याचे सांगितले जात आहे. या व्यक्तीने रोहित शेट्टीच्या घराबाहेर गोळीबार केल्याचा दावा केला आहे.

हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

सोशल मीडियावर, शुभम लोणकर नावाच्या व्यक्तीने रोहित शेट्टीच्या गोळीबाराच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली आहे. तो त्याच्या पोस्टमध्ये लिहितो, " आज मुंबईतील दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरावर (शेट्टी टॉवर) झालेल्या गोळीबाराची जबाबदारी शुभम लोंकर आरजू बिश्नोई घेत आहे."

Rohit Shetty House Firing case
Rohit Shetty: घराबाहेर गोळीबार झाला तेव्हा रोहित शेट्टी कुठे होता? हल्लेखोराबद्दल समोर आली महत्त्वाची माहिती

संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला इशारा आहे

पुढे, तो धमकी देत, लिहितो, "आम्ही त्याला अनेक वेळा मेसेज केला आहे की आमच्या कामात हस्तक्षेप करणं थांबवा, पण तो समजत नाही. हा फक्त एक छोटासा ट्रेलर आहे. जर त्याला आमचा निरोप पुढे समजला नाही, तर त्याला त्याच्या घराबाहेर नाही तर त्याच्या बेडरूममध्ये, त्याच्या छातीत गोळ्या घातल्या जातील. हा संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीला इशारा आहे."

Rohit Shetty House Firing case
Rohit Shetty House Firing: रोहित शेट्टी हल्ला प्रकरणाला नवे वळण; बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणाशी थेट कनेक्शन
Rohit Shetty House Firing case
Rohit Shetty House Firing case

बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट हाल करु

त्याच्या पोस्टमध्ये पुढे, शुभम लोंकर आरजू बिश्नोई लिहितो, 'वेळेत सुधार, नाहीतर तुझे खूप हाल होतील. आम्ही बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट हाल करु. आम्ही ज्यांना ज्यांना फोन केला आहे, वेळेत सुधारा, नाहीतर तुम्हाला लपण्याची जागा कमी पडेल. तू आणि आमचे सर्व शत्रू, तयार राहा. लवकरच भेटू.' पोलिसांनी अद्याप या सोशल मीडिया पोस्टवर किंवा बिश्नोई प्रकरणावर भाष्य केलेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com