Riteish Deshmukh: 'ते संपले पण, काँग्रेस संपली नाही...' लोकसभेत मुसंडी मारल्यानंतर रितेश देशमुखने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ चर्चेत

Vilasrao Deshmukh Viral Video: देशभरातील लोकसभा निवडणुकांध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. या मोठ्या विजयानंतर दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा एक व्हिडिओ सध्या खास चर्चेत आहे. अभिनेते रितेश देशमुख यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Riteish Deshmukh: 'ते संपले पण, काँग्रेस संपली नाही...' लोकसभेत मुसंडी मारल्यानंतर रितेश देशमुखने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ चर्चेत
Vilasrao Deshmukh Viral Video: Saamtv

नुकतेच देशासह राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या लोकसभा निवडणुकीत एनडीएला धक्का देत काँग्रेसनेही घवघवीत यश मिळवले. विशेष म्हणजे काँग्रेसने राज्यात सर्वाधिक जागा मिळवण्याचाही करिश्मा केला. या निकालानंतर राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अभिनेता रितेश देशमुख याने शेअर केलेल्या व्हिडिओची सर्वत्र चर्चेत होत आहे.

मराठी तसेच हिंदी सिने जगतातील यशस्वी अन् राजबिंडा अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. रितेश देशमुख अभिनय जगतात असला तरी त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. त्यांचे वडील विलासराव देशमुख काँग्रेसचे मोठे नेते होते तर सध्या बंधुही राजकारणात आहेत. त्यामुळे रितेश देशमुख अनेकदा हे राजकीय व्यासपीठावरही पाहायला मिळतात. नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने मोठे यश मिळवल्यानंतर त्यांनी विलासराव देशमुख यांचा खास व्हिडिओ शेअर केला आहे.

ज्यामध्ये ते म्हणतात की, लोकांची चळवळ म्हणजे काँग्रेस. इतकं विस्तृत रुप काँग्रेसला प्राप्त झाले आहे. अनेकांनी प्रयत्न केले काँग्रेस संपवाययचे. ते संपले पण काँग्रेस संपली नाही. हा एवढ प्रचंड इतिहास या काँग्रेसचा आहे. त्यागाचा बलिदानाचा. देशाच्या स्वातंत्र्याचा इतिहास आहे. ती काँग्रेस कुणी संपवू म्हणल्याने संपणार नाही, असे म्हणताना दिसत आहेत.

Riteish Deshmukh: 'ते संपले पण, काँग्रेस संपली नाही...' लोकसभेत मुसंडी मारल्यानंतर रितेश देशमुखने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ चर्चेत
Maharashtra Politics: लोकसभेतल्या अपयशामुळे राज्यात महायुतीत फूट? विधानसभेसाठी भाजपची एकला चलोची भूमिका?

रितेश देशमुखच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दरम्यान, या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने १७ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १३ जागांवर पक्षाला मोठा विजय मिळाला असून यामध्ये रितेश देशमुख यांचे बंधु अमित देशमुख यांचाही मोलाचा वाटा आहे.

Riteish Deshmukh: 'ते संपले पण, काँग्रेस संपली नाही...' लोकसभेत मुसंडी मारल्यानंतर रितेश देशमुखने शेअर केलेला 'तो' व्हिडिओ चर्चेत
Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक; प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com