Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंची बॉक्स ऑफिसवर हवा, दुसऱ्या सोमवारी 'राजा शिवाजी'नं किती कमावले?

Raja Shivaji Box Office Collection Day 11 : रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' चित्रपट लवकरच आपले बजेट वसूल करणार आहे. चित्रपटाने ११ दिवसांत छप्परफाड कमाई केली आहे.
Raja Shivaji Box Office Collection Day 11
Riteish - Raja Shivaji Collectionsaam tv
Published On
Summary

'राजा शिवाजी' १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'राजा शिवाजी' लवकरच आपले बजेट वसूल करेल.

'राजा शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुख यांनी केले आहे.

रितेश देशमुखचा ड्रीम प्रोजेक्ट 'राजा शिवाजी' सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने ११ दिवसांत ७० कोटींचा टप्पा पार केला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. या चित्रपटात हिंदीसोबतच मराठी कलाकार झळकले आहे. रितेश भाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली असून जिनिलियाने सईबाईंची भूमिकेत झळकली आहे. चित्रपटात धुरंधर स्टार संजय दत्त अफजल खानाच्या भूमिकेत दिसला. या ऐतिहासिक चित्रपटाने किती कोटींचा गल्ला जमावला, जाणून घेऊयात.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ११

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' चित्रपटाने ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या सोमवारी २.४० कोटी रुपयांची कमाई केली, जी मागील दिवसांच्या तुलनेत ६४.७ टक्के घट दर्शवते. सोमवारच्या कमाईनंतर, या चित्रपटाने ७० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला असून, भारतात एकूण ७०.६५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाची एकूण ग्रॉस कमाई ८३.८० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हिंदी आवृत्तीने केवळ ९ टक्के प्रेक्षक उपस्थितीसह ५० लाख रुपयांची कमाई केली, तर मराठी आवृत्तीने २३ टक्के प्रेक्षक उपस्थितीसह १.९० कोटी रुपयांचा गल्ला जमवला.

'राजा शिवाजी' बजेट

मीडिया रिपोर्टनुसार, 'राजा शिवाजी' हा चित्रपट ७५-१०० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवण्यात आला आहे. चित्रपटाने प्रदर्शनाच्या ११ दिवसांत ७० कोटींहून अधिक कमाई केली असून आता लवकरच चित्रपट आपले बजेट वसूल करताना दिसेल.

रेकॉर्ड ब्रेक कामगिरी

७० कोटी रुपयांसह 'राजा शिवाजी' सध्या भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट आहे. दुसऱ्या स्थानासाठी त्याला 'बाई पण भारी देवा' या सिनेमाला टाकावे लागेल.

  • सैराट – ₹९० कोटी

  • बाईपण भारी देवा – ₹७६.२८ कोटी

  • राजा शिवाजी – 70 कोटी

  • वेड – ₹६१.२ कोटी

  • नटसम्राट – ₹४२ कोटी

Raja Shivaji Box Office Collection Day 11
Famous Actor Death : प्रसिद्ध अभिनेत्याचे भीषण कार अपघातात निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com