Manasvi Choudhary
उन्हाळ्यात संत्री या फळाचे सेवन अधिक केले जाते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी संत्री फायदेशीर आहेत.
संत्री पौष्टिक गुणधर्म आणि चवीसाठी ओळखतात. नियमितपणे संत्री खाल्ल्याने आरोग्याच्या आनेक समस्या दूर होण्यास मदत होते.
दररोज बाजारात मोठ्या प्रमाणात संत्र्याची विक्री होताना तुम्हालाही असा प्रश्न पडलाच असेल की, भारतात सर्वाधिक संत्री कुठे तयार होतात?
संत्री उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.भारतात संत्र्याचे पीक हे महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि पंजाबमध्ये होते. याशिवाय इतर राज्यातही संत्र्याची लागवड करतात.
संत्र्याच्या लागवडीसाठी उबदार हवामान आणि सुपीक जमीनीची आवश्यकता असते. भारतात अनेक भागांमध्ये संत्र्याची लागवड केली जाते.
महाराष्ट्रात नागपूर 'ऑरेंज सिटी' म्हणून ओळखली जाते. भारतातील सर्वात जास्त संत्र्याचे उत्पादन येथून होते.
मध्यप्रदेश हे भारतातील संत्र्यांचे सर्वात मोठे उत्पादक राज्य आहे. देशाच्या एकूण संत्र्याच्या उत्पादनात या राज्याचा मोठा वाटा आहे.