
देशातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या घरी सध्या लग्नसराई सुरू आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा छोटा मुलगा अर्थात उद्योगपती अनंत अंबानी (Anant Ambani) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचं प्री- वेडिंग गुजरातमधील जामनगरमध्ये पार पडणार आहे. अनंत आणि राधिका यांचा प्री- वेडिंगसोहळा १ ते ३ मार्च दरम्यान रंगणार आहे. यांच्या प्री- वेडिंगसोहळ्यामध्ये फक्त बॉलिवूडकरच नाही तर, हॉलिवूडमधीलही अनेक सेलिब्रिटीही उपस्थिती लावणार आहेत. त्यासोबतच राज्यातील अनेक दिग्गज मान्यवरही लग्नासाठी उपस्थिती लावणार आहेत. (Bollywood News)
अनंत-राधिका यांच्या तीन दिवसीय प्री-वेडिंग कार्यक्रमासाठी देशासह परदेशातील दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. यावेळी जगप्रसिद्ध गायिका रिहानानेही उपस्थिती लावली आहे. सध्या सोशल मीडियावर रिहानाची जोरदार चर्चा होत आहे. रिहानासोबतच तिची टीमदेखील प्री-वेडिंग सोहळ्यासाठी जामनगरमध्ये पोहोचली आहे. रिहाना एअरपोर्टवर पोहोचल्यानंतर तिच्या सामानाची सध्या चाहत्यांमध्ये होत आहे. तिचा बोजा बिस्तारापाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले. तिचं सामान मोठमोठ्या ट्रक-ट्रॉलीमधून आणत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Bollywood)
तिच्या सामानाची सध्या इन्स्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. रिहानाचं सामान पाहून नेटकऱ्यांनी, ‘जामनगरच्या लग्नात असं काहीतरी होणार आहे, जे याआधी कोणत्याच भारतीय लग्नात झाले नसेल.’ अशी एका युजर्सने प्रतिक्रिया दिली आहे. तिच्या सामानाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पाहून युजर्स म्हणतात, ‘असं दिसतंय की रिहाना लग्नाच्या निमित्ताने भारतातंच शिफ्ट होतेय.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘कोणीतरी तिला सांगा की, तुला कायमचं जामनगरमध्येच राहायचं नाही.’ तर आणखी एक युजर म्हणतो, ‘या लग्नामध्ये रिहानाकडूनच हुंडा मिळणार आहे.’ काहींनी असेही विचारले की, ‘ही भारतात शिफ्ट होते आहे का?’ (Hollywood)
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग लग्नसोहळ्याला अमिताभ बच्चन, रजनीकांत, अक्षय कुमार, शाहरुख खान, जगप्रसिद्ध गायिका रिहाना, डेव्हिड ब्लेन, अरिजित सिंह, दिलजीत दोसांझ, मराठमोळे गायक अजय-अतुल, आमिर खान, सलमान खान, सैफ अली खान, माधुरी दीक्षित, रणवीर सिंह, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट, विक्की कौशल, कतरिना कैफ असे अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत. त्यासोबतच अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग सोहळ्याला राज्यातील राजकीय मंडळींनीही उपस्थिती लावणार आहेत. त्यामध्ये, उद्धव ठाकरे व त्यांचे कुटुंबीय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनीही उपस्थिती लावली आहे. प्री-वेडिंगनंतर १२ जुलैला या दोघांचा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडणार आहे. (Entertainment News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.