Monalisa: मोनालिसाचं स्वप्न झालं पूर्ण, भोजपुरी अभिनेत्रीने पोस्ट शेअर करून चाहत्यांना दिली खुशखबर

Monalisa Dream Come True: भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोनालिसाने पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.
Monalisa Dream Come True
Monalisa Dream Come TrueSaam Tv
Published On

Monalisa Dream Come True:

भोजपुरी अभिनेत्री मोनालिसाची एक पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मोनालिसाने पोस्ट शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोनालिसाने सांगितले की, तिने तिचे आणखी एक स्वप्न पूर्ण केले आहे.

तिने आपलं स्वतःच नवीन घर घेतलं आहे. मोनालिसाने 5 बेडरूमचा अपार्टमेंट खरेदी केला आहे. पोस्ट शेअर करून तिने आपल्या घराची पहिली झलकही दाखवली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Monalisa Dream Come True
Shaitaan New Song: अजय देवगणच्या शैतानमधील दुसरं गाणं आऊट, 'ऐसा मैं शैतान' पाहून घाबरले चाहते

'बिग बॉस 10' फेम मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्रामवर पती विक्रांत सिंग राजपूतसोबतचे काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, ''आणखी एक स्वप्न पूर्ण झाले आहे. देवाचे आभार. गणपती बाप्पा मोरया.''  (Latest Marathi News)

यासोबत मोनालिसाने कॅप्शनमध्ये हॅशटॅग न्यू होम, हॅशटॅग स्वीट होम, हॅशटॅग 5 बीएचके, हॅशटॅग स्वप्ने खरे आणि हॅशटॅग बिग हाउस ड्रीम, असे लिहिले. मोनालिसाने ही पोस्ट शेअर केल्यापासून तिच्या पोस्टवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Monalisa Dream Come True
The Indrani Mukerjea Story च्या रिलीजचा मार्ग मोकळा, हायकोर्टाने सीबीआयची याचिका फेटाळली

मोनालिसाने तिच्या नवीन घराची एक छोटीशी झलक दाखवली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या घराच्या मंदिरात गणपतीची मूर्ती दिसत आहे. तसेच घराची चावी तिच्या पायाजवळ ठेवलेली दिसत आहे. मोनालिसाच्या घराची ही चावी खूप खास आहे. या चावीवर मोनालिसा आणि विक्रांत यांची नावे लिहिली आहेत. तिच्या पोस्टमध्ये मोनालिसाने काही सेल्फी देखील पोस्ट केल्या आहेत. ज्यात घरासोबत तिचे स्मितहास्य असलेला फोटो आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com