Rashmika- Vijay: रश्मिका- विजय पुन्हा एकदा रिलेशनशिपमध्ये ?; चर्चेला उधाण...

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांची ऑन-स्क्रीन जोडी सर्वांनाच आवडत असून खऱ्या आयुष्यातही यांच्या सुपरहिट जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest News
Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest NewsSaam Tv
Published On

Rashmika- Vijay: दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना यांची ऑन-स्क्रीन जोडी सर्वांनाच आवडते. खऱ्या आयुष्यातही यांच्या सुपरहिट जोडीला एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा आहे.

अनेकदा हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. अनेकवेळा हे दोघे हॉलिडे आणि डेटींगसाठी एकत्र बाहेर जात असल्याच्याही चर्चा झाल्या आहेत, मात्र त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपवर अधिकृतपणे कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest News
Mystery Boy In Bollywood: बॉलिवूडमधील प्रत्येक मुलीसोबत दिसतो 'हा' मिस्ट्री बॉय, कोण आहे हा महाशय?

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवराकोंडा यांनी न्यू इयर व्हेकेशनबद्दल कोणातीही माहिती दिली नसली तरी, व्हायरल झालेल्या फोटोंवरुन ते परदेशात सुट्टीचा आनंद लुटत आहेत. विजय देवराकोंडा आणि रश्मिका मंदान्ना या दोघांनी एकत्र सुट्टी साजरी करत नव्या वर्षाचे स्वागत मोठ्या दणक्यात केले आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेले हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनची चर्चा पुन्हा एकदा होऊ लागली आहे. जरी त्यांनी त्यांच्यातील असलेल्या नात्याला पुष्टी दिली नसली तरी त्यांची चर्चा सध्या होत आहे.

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest News
Deepika Padukone Birthday: दीपिका पदुकोनच्या 'या' माहीत नसलेल्या गोष्टी

नववर्षाच्या निमित्ताने विजयने नुकताच एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. शेअर केलेल्या फोटोत कॅप्शन दिले की, ' एका वर्षापूर्वी आपल्याकडे असे काही क्षण होते, जेव्हा आम्ही जोरजोरात हसत होतो, शांतपणे रडलो, लक्ष्याचा पाठलाग केला, काही जिंकले, काही हरले. आपण बरेच सण एकत्र साजरे केले, कारण हे जीवन आहे.

तर दुसरीकडे, विजय नंतर रश्मिकानेही इन्स्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ती बीचवर आराम करताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये 'हॅलो 2023...' असे लिहीले.

Rashmika Mandanna and Vijay Devarakonda Latest News
Aryan Khan: 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनेत्रीला करतोय आर्यन खान डेट? दुबईतल्या 'त्या' फोटोंवरून बोंबाबोंब

दोघांचेही हे फोटो सध्याचे नसून मालदीव ट्रिपचे आहेत. चाहत्यांचे म्हणणे आहे की त्यांनी त्यांचे पूर्वीचे फोटो नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शेअर केले आहेत तेव्हा ते एकत्र होते, कारण फोटोंमध्ये दिसणारी पार्श्वभूमी रश्मिकाने ऑक्टोबरमध्ये शेअर केलेल्या फोटोंसारखीच आहे. त्यातच, नवीन वर्षाच्या निमित्ताने दोघेही एकत्र असल्याचे काही चाहत्यांचे मत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com