Mystery Boy In Bollywood: बॉलिवूडमधील प्रत्येक मुलीसोबत दिसतो 'हा' मिस्ट्री बॉय, कोण आहे हा महाशय?

नुकतंच नव वर्षाचं स्वागत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात केले. परदेशातील त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यात कोण कोण हजर होते, याची सध्या चर्चा होत आहे.
Mistry Boy In Bollywood
Mistry Boy In Bollywood Saam Tv

Orhan Avatramani: नेहमीच बॉलिवूड कलाकार सोशल मीडियाच्या गऱ्हाळ्यात असतात. जितके सेलिब्रिटी नाही त्यापेक्षा जास्त स्टारकिड्स नेटकऱ्यांच्या चर्चेत असतात. स्टार किड्स नेहमीच माध्यमांच्या गऱ्हाळ्यात असतात. स्टार किड्स अनेकदा वेगवेगळ्या पार्टीला जातात. त्यांच्या खासगी पार्टीतील काही फोटोही अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल झालेत.

नुकतंच नव वर्षाचं स्वागत अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी परदेशात केले. परदेशातील त्यांचे फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यात कोण कोण हजर होते, याची सध्या चर्चा होत आहे.

Mistry Boy In Bollywood
Aryan Khan: 'बोल्ड आणि ब्युटीफुल' अभिनेत्रीला करतोय आर्यन खान डेट? दुबईतल्या 'त्या' फोटोंवरून बोंबाबोंब

नववर्षाच्या पार्टीसाठी अभिनेत्री काजोलची लेक न्यासा देवगण हिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल होत आहेत. तिच्या सोबत यावेळी जान्हवी कपूर, सारा अली खान यांच्या पार्टीचे फोटोही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. पण यासर्वांमध्ये एक चेहरा साम्य होता, तो अनेकदा मिस्ट्री बॉय स्टार किड्सच्या पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे. चला तर जाणून घेऊया नक्की कोण आहे तो.

Mistry Boy In Bollywood
Pathaan Trailer: शाहरुखच्या 'पठान'ला मोठा झटका, जे नको होत तेचं घडलं...

अभिनेत्री काजोल देवगणची मुलगी न्यासा देवगणने दुबईत नवं वर्षाचं सेलिब्रेशन मोठ्या धुमधडाक्यात केले. या फोटोत तिच्यासोबत तानिया श्रॉफ आणि तो मिस्ट्री बॉयही दिसून येत आहे. त्याचं ओरहान अवत्रामाणी (Orhan Awatramani) असं नाव आहे.

यापूर्वी ओरहान आणि जान्हवी कपूरसोबतही काही पार्ट्यांमध्ये स्पॉट झाला होता. तसेच खुशी कपूरसोबतही ओरहानचे काही फोटो व्हायरल झाले होते. गेल्या महिन्यातच एका पार्टीत ओरहान आणि सारा अली खान एका पार्टीतच दिसले होते. त्या दोघांच्याही पार्टीचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Mistry Boy In Bollywood
Celebrity Bought House In Young Age: 'या' कलाकारांनी लहान वयातच मारली मोठी मजल, झाले कोट्यावधींच्या घराचे मालक

ओरहान हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा असून तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसला आहे. ओरहान हा अॅनिमेटर आहे. तसंच टॉप फोर्ड, व्हिजन ऑफ सूपर आणि प्राडा यासारख्या मोठ्या ब्रँडशीही त्याचे कनेक्शन आहे.

ओरहान उर्फ ओरी हा एका बड्या उद्योगपतीचा मुलगा आहे, ओरहानला बड्या पार्ट्यांचा शौक असून तो अनेकदा मोठ्या पार्ट्यांमध्ये दिसतो. ओरहान हा अॅनिमेटर आहे. तसंच टॉप फोर्ड, व्हिजन ऑफ सूपर आणि प्राडा यासारख्या मोठ्या ब्रँडशीही तो जोडला गेला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com