Yo Yo Honey Singh: नंबर प्लेटसाठी २८ लाख मोजणाऱ्या हनी सिंगने 'या' कारणामुळे विकल्या सर्व गाड्या...

नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात रॅपर हनी सिंगने त्याच्या आयुष्यातील काही गोष्टींचा उलगडा केला आहे.
Yo Yo Honey Singh
Yo Yo Honey SinghSaam Tv

Yo Yo Honey Singh: तरुणांना आपल्या खास शैलीतील रॅपने ओळख निर्माण करणाऱ्या हनी सिंगची क्रेझ तरुणांमध्ये कायम आहे. भारतीय चित्रपसृष्टीत त्याची ओळख रॅपर म्हणूनच आहे. गेले काही बराच काळ तो प्रसिद्धी झोतात नव्हता. त्याने आपल्या रॅपने तरुणांसह सर्वांनाच थिरकायला भाग पाडले. आज आपण त्याच्या काही खासगी गोष्टी जाणून घेणार आहोत.

Yo Yo Honey Singh
Santha Prabhu: समांथा प्रभूच्या मित्राने दिले हेल्थ अपडेट, जाणून घ्या तब्येतीविषयीची माहिती...

नुकताच पार पडलेल्या 'द बॉम्बे जर्नी' हनी सिंगने युट्युबच्या या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी त्याने बऱ्याच गप्पा प्रेक्षकांसोबत मारल्या. या कार्यक्रमात त्याने आपले महाराष्ट्र कनेक्शनही सांगितले. सोबतच सर्वात प्रमुख बाब म्हणजे त्याच्याकडे असलेल्या लक्झरीयस कार्सबद्दलही त्याने सांगितले. सोबतच कारच्या नंबर्स वरूनही काही खुलासे केले आहेत.

Yo Yo Honey Singh
Ved Movie : बॉक्स ऑफिसवर 'वेड' सिनेमाचा धूमाकूळ; अवघ्या तीन दिवसात केली 'इतकी' कमाई, रितेशने मानले प्रेक्षकांचे आभार

प्रत्येक चाहत्याला आपल्या आवडत्या कलाकाराकडे कोणती कार आहे. असा प्रश्न अनेकदा पडलेला असतो. कलाकार मंडळी आपल्या चाहत्यांसाठी काही खास फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतात. अनेकदा हनी सिंग देखील काही खास गाडीसोबतचे फोटो शेअर करत असतो. त्याच्याकडे ऑडी R8 गाडी होती, त्याने फक्त नंबर प्लेटसाठी तब्बल २८ लाख रुपये खर्च केले आहेत.

Yo Yo Honey Singh
Deepika-Prabhas:दीपिका-प्रभासच्या 'प्रोजेक्ट के'ने प्रदर्शनापूर्वीच केली कोट्यावधींची कमाई

गाडीविषयी तो म्हणतो, "माझ्याकडे ऑडी R8 ही गाडी होती. तिच्यासाठी मी R8 हा खास नंबर केला होता. हा नंबर मी महाराष्ट्र आरटीओ मधून विकत घेतला होता. पण गेले काही काळ मी आजारी असल्याने सर्वच माझ्याकडे असलेल्या गाड्या विकून टाकल्या होत्या. मी गाडी चालवूच शकत नव्हतो, आता मला इच्छाही नाही."

Yo Yo Honey Singh
Kiran Mane: 'बिग बॉस माझे गॉड फादर...' साताऱ्याचा बच्चन अखेरच्या क्षणी भावूक...

झालेल्या या कार्यक्रमात बोलताना हनी सिंगने त्याच्या मानसिक आजार आणि वेदनादायी संघर्षावर भाष्य केले. इंडस्ट्रीमध्ये पुन:रागमन करत असताना स्वतः मध्ये त्याने फारच बदल केले होते. मानसिक आजारातून जात असताना हनी सिंगने अनेक कठीण काळाला तोंड दिले. त्या काळातून जातं असताना तो नेहमीच तो स्वतःच्या मृत्यूची वाट पाहायचा असं त्याने स्पष्ट सांगितले. हा काळ त्याच्यासाठी प्रचंड खडतर होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com