Ranveer Singh: धुरंधर रणवीर सिंग 'त्या' प्रकरणामुळे पुरता अडकला, मंदिर अन् कोर्टाची पायरी चढावीच लागणार, नेमकं प्रकरण काय?

Ranveer Singh: रणवीर सिंग बिनशर्त माफी मागेल आणि एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करेल. 'कांतारा २' दिग्दर्शक आणि ऋषभ शेट्टीची खिल्ली उडवल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होईल.
Ranveer Singh
Ranveer SinghSaam tv
Published On

Ranveer Singh: ‘धुरंधर २’ चित्रपटाच्या यशाचा जल्लोष सुरू असतानाच अभिनेता रणवीर सिंग नव्या वादात अडकला आहे. मंगळवार, २४ मार्च रोजी कर्नाटक उच्च न्यायालय येथे झालेल्या सुनावणीदरम्यान रणवीरने ‘कांतारा’ चित्रपटातील एका सीनची विचित्र पद्धतीने नक्कल केल्याबद्दल बिनशर्त माफी मागण्याचा इरादा व्यक्त केला. यासाठी तो प्रतिज्ञापत्र (अ‍ॅफिडेव्हिट) दाखल करणार असल्याचेही त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले.

चामुंडी मंदिरात जाऊन प्रार्थना

इतकेच नव्हे, तर आपल्या चुकीबद्दल क्षमा मागण्यासाठी तो चामुंडी मंदिर येथे जाऊन प्रार्थना करेल, असेही स्पष्ट करण्यात आले. मात्र, या भूमिकेवर तक्रारदार पूर्णपणे समाधानी नसल्याचे दिसून आले. त्यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की, रणवीरने सोशल मीडियावर माफी मागणे पुरेसे नाही, तर ती सार्वजनिकरित्या माफी आवश्यक आहे.

Ranveer Singh
Dhurandhar 2: 'धुरंधर २' कायदेशीर अडचणीत; चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी, उच्च न्यायालयात याचिका दाखल

काय आहे नेमकं प्रकरण?

हा संपूर्ण वाद २०२५ मध्ये गोव्यात झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया दरम्यान घडलेल्या घटनेवरून सुरू झाला. त्या कार्यक्रमात रणवीरने ‘कांतारा’ चित्रपटातील ऋषभ शेट्टी यांच्या अभिनयाचे कौतुक करताना एका महत्त्वाच्या सीनची विचित्र पद्धतीने नक्कल करून दाखवली होती. पण या कृतीमुळे काहींच्या भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला.

Ranveer Singh
Fame Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; 'या' गंभीर आजाराशी झुंज ठरली अपयशी

यानंतर रणवीरविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, धार्मिक भावना दुखावल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. सुनावणीदरम्यान रणवीरचे वकील साजन पूवय्या यांनी सांगितले की, अभिनेता लवकरच औपचारिक माफी मागेल आणि संबंधित प्रक्रिया पूर्ण करेल. दुसरीकडे, तक्रारदाराच्या वकिलांनी रणवीरची माफी 'दिखावा' असल्याचा आरोप केला. त्यांनी नमूद केले की, सोशल मीडियावरील पोस्ट ही पुरेशी नसून, प्रत्यक्ष मंदिरात जाऊन माफी मागणे गरजेचे आहे.

या प्रकरणात न्यायमूर्ती एम. नागप्रसन्ना यांनीही रणवीरचे वर्तन योग्य नसल्याचे निरीक्षण नोंदवले. मात्र, ही चूक अनावधानाने झाल्याचेही त्यांनी नमूद केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० एप्रिल रोजी होणार असून, तोपर्यंत रणवीरने माफी मागितल्यास पुढील कारवाई थांबवण्याचा विचार केला जाऊ शकतो असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com