Ranveer Singh : रणवीर सिंगची जाहिरात वादात; कंपनीकडे जाहिरात हटविण्याची मागणी, कारण काय?

Ranveer Singh advertisement News : अभिनेता रणवीर सिंगची 'हेल्थ ओके' जाहिरात वादात सापडली आहे. फार्मा कंपन्यांच्या संघटनेने 'मॅनकाइंड'ला कंपनीकडे ही जाहिरात मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Ranveer Singh
Ranveer Singh Saam Tv
Published On

Ranveer Singh Latest News : अभिनेता रणवीर सिंगची 'हेल्थ ओके' जाहिरात वादात सापडली आहे. फार्मा कंपन्यांच्या संघटनेने 'मॅनकाइंड'ला कंपनीकडे ही जाहिरात मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. केमिस्ट संघटनेने या जाहिरातीमधील मांसाहारी आणि शाकाहारी तुलनेवर आक्षेप घेतला आहे. (Latest Marathi News)

मीडिया रिपोर्टनुसार, 'ऑल इंडिया ऑर्गनायजेशन ऑफ केमिस्ट्स अँड ड्रगिस्ट्स' या संघटनेच्या अनुसार, या जाहिरातीतून दिशाभूल केल्याचं म्हटलं आहे. या संघटनेने मॅनकाइंडला लिहिलेल्या पत्रात म्हटलं की, 'हेल्थ ओके'च्या जाहिरातीत शाकाहारी व्यक्तींमध्ये व्हिटॅमिनची कमतरता असल्याचा दावा करण्यात आला आहे. या जाहिरातीत व्यक्तीच्या शरीरातील व्हिटॅमिनची कमतरता सप्लिमेंट रोखू शकते, असा दावा करण्यात आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ranveer Singh
हे काय पाहावं लागतंय?, पॉर्न स्टारसोबत जाहिरात करणं Ranveer Singh ला पडलं महागात; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

या जाहिरात कॅम्पेनमध्ये तीन भारतीय शाकाहारी व्यक्तीपैकी एकामध्ये व्हिटॅमिनची कमतरता असल्याचा दावा करण्यात आला असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे.

Ranveer Singh
Mallika Rajput: कंगना रनौतसोबत काम केलेल्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू, चाहत्यांना बसला मोठा धक्का

फार्मा संघटनेचे म्हणणं आहे की, अनेक राजकीय नेते शाकाहार करण्याचं आवाहन करतात. १२ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, भारतात बहुतांश लोक शाहाकार करतात. त्यामुळे या जाहिरातीतून दिशाभूल करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे.

पत्रात पुढे म्हटलं आहे की, 'प्रसिद्ध अभिनेत्याचा वापर जाहिरातीत केल्याने त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो'. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ आणि वस्तूंची विक्री कायदा १९३० कायद्यातंर्गत जाहिरात मागे घेण्याची मागणी केमिस्ट संघटनेने केली आहे.

फार्मा कंपनीच्या संघटनेचे महासचिव राजीव सिंघल यांनी म्हटलं की, 'तुमच्या फायद्यासाठी जाहिरातीचा कसाही वापर करता, ही पूर्णपणे दिशाभूल आहे'.

'हेल्थ ओके' जाहिरातीत दावा करण्यात आला आहे की, या गोळ्या खाल्ल्याने व्हिटॅमिनची कमतरता भरून काढली जाऊ शकते. टॉरिन आणि जिनसेंगमुळे व्यक्तीला उत्साही राहण्यास मदत होते, असा दावा करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com