प्रसिद्ध गायिका आणि लेखिका मल्लिका राजपूतचा (Mallika Rajput) मृत्यू झाला आहे. राहत्या घरामध्येच मल्लिका राजपूतचा संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंगळवारी सकाळी सुल्तानपूरच्या सीताकुंड येथील घरामध्ये तिचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. तिने आत्महत्या केली असल्याची चर्चा सुरू आहे. अशामध्ये पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मल्लिकाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयामध्ये पाठवला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसारस मल्लिका राजपूतने मंगळवारी सकाळी आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. पोलिस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना तिचा मृतदेह घरातील खोलीमध्ये लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गायिकाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. गायिकेच्या निधानंतर तिचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.
मल्लिका राजपूतच्या आईने सांगितल्याप्रमाणे, त्यांची मुलगी यूट्यूबर होती आणि ती मुंबईत राहत होती. मल्लिकाने प्रदीप शिंदे जनार्दन याच्याशी लग्न करून तिने चार-पाच वर्षांपूर्वी घर सोडले होते. या दोघांच्या नात्यामध्ये दूरावा असल्याचे देखील बोलले जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी फॉरेन्सिक तपासणीनंतर मल्लिकाची खोली सील करून तपास सुरू केला आहे.
काल रात्री मल्लिकाचा तिच्या कुटुंबियांसोबत वाद झाल्याचे बोलले जात आहे. हे प्रकरण इतके वाढले होते की, पोलिसांना सोडवायला यावे लागले होते. यानंतर काय झाले आणि मल्लिकाने आत्महत्या कशी केली? अशा सर्व प्रश्नांचा आता पोलिस तपास करत आहेत. ती नशेत होती, असे पोलिसांचे म्हणणे असले तरी अहवाल आल्यानंतरच खरी माहिती समोर येईल.
प्रसिद्ध गायिका मल्लिका राजपूतने बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतसोबत चित्रपटामध्ये काम केले आहे. याशिवाय तिने आपल्या आवाजाने लोकांची मनं जिंकली आहेत. मल्लिका राजपूतला तिच्या 'यारा तुझे' म्युझिक अल्बमने खूप लोकप्रियता मिळाली होती. इतकेच नाही तर मल्लिकाने अनेक वेब सीरिज, सीरियल आणि अल्बममध्येही आपली जादू दाखवली आहे. मल्लिकाने जेव्हा इंदूरचे आध्यात्मिक गुरू भैय्यूजी महाराज यांच्यावर आरोप केले होते तेव्हा ती चर्चेत आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.