Rakhi Sawant: राखीचं नेमकं चाललंय तरी काय? आधी भांडण आता कोर्टाबाहेर म्हणते, 'आदिलच्या आठवणी मला...'

सध्या आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. राखीचा एक कोर्टाबाहेरील एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Rakhi Sawant And Aadil Khan
Rakhi Sawant And Aadil KhanSaam Tv
Published On: 

Rakhi Sawant: बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत सध्या कमालीची चर्चेत आली आहे. तिच्यात आणि आदिलमध्ये गेल्या काही दिवसात बरेच वादाचे खटके उडत त्यांच्यात आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या. राखीने आदील विरोधात काही आरोप करत पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. त्याला ओशिवरा पोलिसांनी ७ फेब्रुवारीला अटक केली होती. या सर्वानंतर काल पुन्हा एकदा आदिलला कोर्टात हजर करण्यात आले होते. त्याच कोर्टाबाहेरील राखीचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Rakhi Sawant And Aadil Khan
Kangana Ranaut Viral Post: बॉलिवूड अवॉर्ड म्हणजे निव्वळ फसवणूक.. म्हणत कांगनाने व्यक्त केला संताप

सध्या आदिलची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. राखीचा एक कोर्टाबाहेरील एक नवा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात राखी म्हणते, "मी आदिलची भेट घेतली असून त्याने माझ्या सोबत व्यवस्थित संवाद साधला नाही. त्याने मला धमकीचाही इशारा दिला आहे." तो मला म्हणतो, " तिहार तुरुंगात मी खूप मोठमोठ्या डॉनला भेटलो आहे. तुला काय करायचं आहे, याबाबत विचार कर. मी बाहेर आल्यावर तुझं काय होईल? असा धमकीवजा इशारा मला आदिलने दिला आहे."

Rakhi Sawant And Aadil Khan
Ameesha Patel: अमिषा पटेलने घेतली न्यायालयात धाव; नेमकं काय आहे प्रकरण?

आदिल पुढे मला बोलला, " मी खूप घाणेरड्या आर्थर रोड तुरुंगात लोकांसोबत राहिलो आहे. कधी त्यांच्यासाठी चहा बनवलाय तर कधी त्यांचे मी पाय दाबून दिले आहे. कधी त्यांचे भांडी ही मी घासले आहे. "

माध्यमांसमोर राखी भावूक होत म्हणते, "आदिल सोबतच्या आठवणी मला आता विसरून जायच्या आहेत. त्याचा मला आता विचार नाही करायचा. संपूर्ण त्याला विसरून जाण्यासाठी मला काही वेळ लागेल."

Rakhi Sawant And Aadil Khan
Dadasaheb Phalke Award: 'दादासाहेब फाळके पुरस्कार'चा इतिहास, आतापर्यंत 'या' पाच मराठमोळ्या कलाकारांनी पटकावला मान

राखीने पती आदिलवर मारहाण व फसवणूक केल्याबरोबरच अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप केला आहे. त्याच्या अटकेनंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. १६ फेब्रुवारीला आदिलला कोर्टात हजर करण्यात आलं होत. त्यानंतर न्यायालयाने आदिलला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com