Dadasaheb Phalke Award: 'दादासाहेब फाळके पुरस्कार'चा इतिहास, आतापर्यंत 'या' पाच मराठमोळ्या कलाकारांनी पटकावला मान

१९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात असून याचे वितरण माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे केले जाते.
Dadasaheb Phalke International Film Festival Awards
Dadasaheb Phalke International Film Festival AwardsInstagram/ @dpiff_official

Dadasaheb Phalke Award History: दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारतर्फे दरवर्षी चित्रपटांमध्ये महत्वपुर्ण कामगिरी करणाऱ्या कलाकारांना आणि तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे दिला जातो. दरवर्षी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

Dadasaheb Phalke International Film Festival Awards
Dadasaheb Phalke International Film Festival Awards: अभिनयातील मानाचा समजल्या जाणाऱ्या 'दादासाहेब फाळके' पुरस्काराचे वितरण, 'या' कलाकारांचा करण्यात आला गौरव

प्राप्तकर्त्याचा त्यांच्या "भारतीय चित्रपटांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी केलेल्या उत्कृष्ट योगदानासाठी" माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे सन्मान केला जातो. भारतीय चित्रपट उद्योगातील प्रतिष्ठित व्यक्तींचा समावेश असलेल्या समितीद्वारे त्या चित्रपटांची, कलाकारांची आणि तंत्रज्ञानाची निवड केली जाते. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख बक्षीस ₹ १०,००,००० देत सन्मान केला जातो. १९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.

Dadasaheb Phalke International Film Festival Awards
Alia Bhatt-Ranbir Kapoor Award: बॉलिवूडचं क्युट कपल ठरलं सर्वोकृष्ट अभिनेता-अभिनेत्री

दादासाहेब फाळके हा पहिला पुरस्कार अभिनेत्री देविका राणी यांना मिळाला होता. मराठमोळ्या अभिनेत्री दुर्गा खोटे (1983), अभिनेता, लेखक, दिग्दर्शक वी. शांताराम (1985), गानकोकिळा लता मंगेशकर (1989), दिग्दर्शक, सिनेनिर्माते, पटकथा लेखक भालचंद्र पेंढारकर (1991), गायिका आशा भोसले (2000) अशा मराठी मनोरंजनसृष्टीतील दिग्गजांना 'दादासाबेब फाळके पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले आहे. आतापर्यंत पाच मराठमोळ्या कलाकारांना मानाच्या 'दादासाबेब फाळके पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले आहे.

Dadasaheb Phalke International Film Festival Awards
Urfi Javed With Rohit Shetty: स्प्लिट्सव्हिलानंतर उर्फी पुन्हा दाखवणार जलवा, 'खतरो के खिलाडी १३' मध्ये करणार हटके कारनामे

दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार इतर संस्थांद्वारेही देण्यात येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com