Raju Srivastava Health Update| राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीबाबत नवी अपडेट समोर; सुधारणा होतेय, पण...

राजू श्रीवास्तवला काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले.
Raju Srivastava Health Update
Raju Srivastava Health Update
Published On: 

Raju Srivastava Health Condition | मुंबई: विनोदी शैलीने खळखळून हसवणारा विनोदवीर राजू श्रीवास्तव गेल्या अनेक दिवसांपासून रूग्णालयात बेशुद्धावस्थेत आहे. राजू श्रीवास्तवला काही दिवसांपूर्वी दिल्लीतील एम्समध्ये दाखल करण्यात आले. राजूचे जगभरातील चाहते तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी बऱ्याच दिवसांपासून प्रार्थना करत आहेत.

दरम्यान, त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याच्या अपडेट समोर येत आहेत. राजू श्रीवास्तवचा मित्र सुनील पालने एक व्हिडिओ शेअर करत राजूच्या प्रकृतीबाबत माहिती दिली होती. नुकतंच राजू श्रीवास्तवच्या प्रकृतीविषयी एक नवीन अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राजूच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे, मात्र सध्या काही दिवस व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. राजू लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांसाठी ही दिलासा देणारी अपडेट आहे.

Raju Srivastava Health Update
WhatsApp वरून बँक अकाउंट डिलीट कसं करायचं? जाणून घ्या सोप्या स्टेप्स

अलीकडेच, राजू श्रीवास्तवची मुलगी अंतराने वडील राजूच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवरून आरोग्याबाबत माहिती दिली होती. 'प्रिय शुभचिंतकांनो, माझे वडील राजू श्रीवास्तवजी यांची प्रकृती आता स्थिर आहे. तसेच या पोस्टद्वारे तिने आवाहन देखील केले होते, ज्यामध्ये तिने कृपया, दिल्लीतील एम्स रूग्णालय आणि राजूच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर प्रकृतीबाबत होत असलेली माहिती विश्वासनीय आहे. इतर कोणत्याही बातम्या आणि माहितीवर विश्वास ठेवू नये, असे म्हटलं होतं.

'एम्स रूग्णालयातील डॉक्टर आणि त्यांची संपूर्ण टीम सर्वोत्तम उपचार करते आहे. त्यांचे आणि त्यांच्या सर्व हितचिंतकांचे आम्ही ऋणी आहोत. आपण सर्वांनी दिलेल्या शुभेच्छांमुळे हे शक्य झाले आहे. आपले प्रेम आणि प्रार्थना सुरूच ठेवावी ही विनंती, असं देखील तिनं म्हटलं होतं.

Raju Srivastava Health Update
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मोठा दिलासा! SC म्हणाले, खटला चालणार नाही

काही दिवसांपूर्वी राजू श्रीवास्तवचा भाऊ दीपू यानेही राजू श्रीवास्तवची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. जोपर्यंत डॉक्टर स्पष्टपणे काही सांगत नाहीत, तोपर्यंत काहीही सांगता येणार नाही, असे त्याने सांगितले होते. डॉक्टरांची संपूर्ण टीम राजू श्रीवास्तवर लक्ष ठेवून आहे. राजू बरा होत आहे. त्याच्या प्रकृतीने साथ द्यायला सुरूवात केली आहे. लवकरच विनोदवीर चाहत्यांना हसवायला सज्ज होईल, असा विश्वास व्यक्त केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.