Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?
Latest Marathi Serial UpdateSaam Tv

Premachi Goshta: सागर- सावनीच्या लग्नाचा वाढदिवसाचं मुक्ता करणार सेलिब्रेशन; प्रेमाची गोष्ट मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Premachi Goshta on Star Pravah: सागर आणि सानवीच्या लग्नाच्या वाढदिवसा निमित्त मुक्ता करणार ग्रँड सेलिब्रेशन. प्रेमाची गोष्ट या मिलिकेत येणार नविन ट्विस्ट.
Published on

स्टार प्रवाहवरील 'प्रेमाची गोष्ट' ही सध्या लोकप्रिय मालिकांपैकी अक आहे. मालिकेनं अनेक प्रेक्षकांच्या मनामध्ये महत्त्वाचं स्थान निर्माण केलं आहे. मालिकेमधील सागर आणि मुक्ताच्या जोडीला अनेक प्रेक्षकांकडून पसंती मिळताना दिसते. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेमध्ये अनेक द्विस्ट पाहायला मिळत आहेत. मागील काही भागांमध्ये सागर आणि मुक्तामधील प्रेम खुलताना दिसतय. तर एकीकडे सावनीच्या कपटी स्वभावामुळे तिचं आयुष्य उद्वस्त झाल्याचे दिसत आहे.

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?
Premachi Goshta Serial Promo: "आईचा अपघात आदित्यने केला आहे...", सागरने मुक्ताला सांगितलं घटनेमागील सत्य; मालिकेचा नवा प्रोमो आऊट

मागच्या महिन्यामध्ये सावनीचं आणि हर्षवर्धनचं लग्न मोडलं, ज्यामुळे तिच्या मनामध्ये मुक्ता आणि मिहिकाविषयी द्वेष निर्माण झाला. मिहिका आणि हर्षवर्धन यांनी काही दिवसांपूर्वी लग्न केलं, ज्यामुळे सावनीला हर्षवर्धनच्या घरातून आणि आयुष्यातून बाहेर पडावं लागलं. त्यानंतर हर्षवर्धनने तिच्या सर्व बँक अकाऊंट्स बंद केली, ज्यामुळे तिच्या जवळचे सर्व पैसे संपले होते. आदित्यने सागरला फोन करून त्यांना घरी घेऊन जाण्याची विनंती केली.

मुक्ता आणि सागरने सावनीला त्यांच्या घरात आणले. परंतु, त्यानंतर सुद्धा सावनीचा कपटी स्वभाव काही बदलेना. सावनीने मुक्ताचा अपमान करण्यासाठी एकही संधी सोडली नाही.परंतु मुक्ताच्या शांत स्वभावामुळे आणि आदित्याच्या काळजीपोटी तिने सावनीला प्रत्येक क्षणी माफ केलं. मात्र इन्द्राने सावनीला चांगलाच धडा शिकवला आहे. मालिकेच्या मागच्या भागामध्ये इन्द्राने सावनीला घरातील मोलकरीण बनवून सोडलं आहे. घरातील भांडीपासून ते सामान खरेदीपर्यंतचे सर्व कामे सावनीला करायला लावले. घरकामांमुळे सावनीचे बारा वाजल्याचं दिसत आहे.

मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण सावनी, मुक्ता आणि सागरच्या आयुष्यात तिढा सुटणार की तिच्या कपटी स्वभावामुळे पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात नव्या आव्हानांना आमंत्रण मिळेल? हे पाहणार आहोत. अगदी काही दिवसांमध्येचं प्रेमाची गोष्टी या मालिकेला प्रेक्षकांकडून पसंती मिळताना दिसतोय. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये सर्व कोळी परिवार त्यांचा सण साजरा करताना दिसत आहे. मालिकेतील मुक्ताच्या लूकचं अनेक प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. मुक्ताच्या सर्व साड्या अनेक महिला प्रेक्षकांना आकर्षित करताना दिसतात. सागरचा खोडकर स्वभाव आणि मुक्तावर प्रेम व्यक्त करण्याची पद्धत काही वेगळीचं आहे.

Edited By : Nirmiti Rasal

Premachi Goshta : प्रेमाच्या गोष्टीमध्ये नवा ट्विस्ट; माधवीच्या अपघाताला कोण कारणीभूत?
Premachi Goshta Promo: सागरची होणार निर्दोष सुटका; कार्तिकला होणार अटक; प्रेमाची गोष्ट मालिकेचा नवा प्रोमो आऊट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com