Premachi Goshta Serial Promo: "आईचा अपघात आदित्यने केला आहे...", सागरने मुक्ताला सांगितलं घटनेमागील सत्य; मालिकेचा नवा प्रोमो आऊट

Premachi Goshta Serial Latest Promo 27 May 2024: मराठी मालिकाविश्वातील 'प्रेमाची गोष्ट' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येताना दिसत आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या माधवीचा अपघात झाला असून तो अपघात आदित्यने केला आहे.
Premachi Goshta Serial Promo: "आईचा अपघात आदित्यने केला आहे...", सागरने मुक्ताला सांगितलं घटनेमागील सत्य; मालिकेचा नवा प्रोमो आऊट
Premachi Goshta Serial PosterSaam TV

मराठी मालिकाविश्वातील 'प्रेमाची गोष्ट' ही लोकप्रिय मालिका आहे. मालिकेत सध्या अनेक ट्विस्ट येताना दिसत आहे. प्रेमाची गोष्ट मालिकेत सध्या माधवीचा अपघात झाला असून तो अपघात आदित्यने केला आहे. त्यामुळे आदित्यला वाचवण्यासाठी सागर मुक्ताशी खोटं बोलताना दिसत आहे. मात्र, आता येत्या भागात सागर मुक्ताला सत्य सांगणार आहे.

Premachi Goshta Serial Promo: "आईचा अपघात आदित्यने केला आहे...", सागरने मुक्ताला सांगितलं घटनेमागील सत्य; मालिकेचा नवा प्रोमो आऊट
Sonu Sood Viral Video : 'मला कॅमेरामन बनायचंय...', सोनू सुदने व्यक्त केली इच्छा व्यक्त; अभिनेत्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

मालिकेच्या नवीन प्रोमोत मुक्ता सागरला घरी घेऊन येते. आणि त्याला सांगते की, हर्षवर्धन मला भेटला होता. त्याने जे सांगितलं ते खरं आहे का? ते खोटं हे ना बोला ना सागर. त्यानंतर सागर होकारार्थी मान डोलावतो आणि म्हणतो की, खरं तर हा अपघात आदित्यकडून झाला आहे. त्यावर मुक्ता सागरा समाजवताना म्हणते की, सागर तुम्हाला समजतयं का, आदित्यने जी चुक केली आहे तो एक गुन्हा आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सागर मुक्ताच्या आईकडे जातो आणि म्हणतो की, तुमचा जो अपघात झाला तो दुर्दैवीच होता. मात्र, तो आपल्या माणसाकडून व्हावा हे त्यापेक्षाही दुःखद आहे. त्यानंतर माधवीला हा धक्का सहन होत नाही. तेवढ्यात मागून आदित्य येतो. मालिकेत आता आदित्य त्याची चूक मान्य करताना दिसणार आहे.

माधवीचा अपघात हा आदित्यकडून झाला आहे. याचाच फायदा सावनी घेते. सावनी ही सागरला पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न करते. परंतु तेवढ्यात मुक्ता येऊन सावनीचा संपूर्ण डाव उधळून लावते. त्यानंतर मुक्ता सागरला सत्य काय आहे ते विचारते. मालिकेच्या येत्या भागात अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहे. मालिकेत आता माधवी आदित्यला काय शिक्षा देणार? या सगळ्याचा सागर आणि आदित्यच्या नात्यावर काय परिणाम होणार? आदित्य मुक्ताचा अजून तिरस्कार करणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. मालिकेने सध्या प्रेक्षकांनी उत्सुकता ताणली आहे. पुढे मालिकेत काय टर्न येणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Premachi Goshta Serial Promo: "आईचा अपघात आदित्यने केला आहे...", सागरने मुक्ताला सांगितलं घटनेमागील सत्य; मालिकेचा नवा प्रोमो आऊट
'हम २ हमारे १२' चित्रपटाला मुस्लिम संघटनांचा विरोध

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com